Flood Affected Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Flood Affected Farmers : ई -केवायसी झाली; नुकसानभरपाई कधी मिळणार?

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, करवीर यासह अन्य तालुक्यांना मोठा पुराचा फटका बसला होता. तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, सांगली शहराला मोठा फटका बसला होता.

sandeep Shirguppe

Kolhapur Sangli Flood Affect Farmers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जुलै-२०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे लाखो हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले होते. याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रीया येत आहेत.

या संदर्भात कृषी विभागाने यादी जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 'केवायसी' करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी 'केवायसी' पूर्ण केली. मात्र, पाच महिने झाले, तरी अनुदानाची रक्कम खात्यावर जमा झाली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, करवीर यासह अन्य तालुक्यांना मोठा पुराचा फटका बसला होता. तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, सांगली शहराला मोठा फटका बसला होता.

बाधित क्षेत्राचे पंचनामे कृषी विभाग, तलाठी कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून बाधित गावांतील नुकसानीचे पंचनामे तयार करून पाठविले होते. यानंतर काही शेतकऱ्यांना ई -केवायसी करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, ६ महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पन्हाळा तालुक्यात १६ हजार शेतकरी वंचित

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात महापुराचे तब्बल ८ दिवस पाणी राहिल्याने खरिपासह ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानीबाबत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शेतकरी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता. यामध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे पन्हाळा तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता.

पन्हाळा तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. १३ कोटी ३२ हजार रुपये मदत देणे आवश्यक असून ११ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतु मंजूर झालेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी वाट पहायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT