Kolhapur Farmer agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Farmer : कोल्हापुरात फुलकोबी, टोमॅटोचे नुकसान, शेतकऱ्यांने पिकावर फिरवला नांगर

Tomato Production : शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. तर दानोळी भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील टोमॅटोचा उठाव होत नसल्याने शेतातच टोमॅटो कुजून जाण्याची वेळ आली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmers Prodcution : कोल्हापूर जिल्ह्यात फुलकोबीला किलोमागे अवघा २ रुपये दर मिळत आहे. शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावच्या महेश विरूपाक्ष सोडगे या शेतकऱ्याने काढणीला आलेल्या उभ्या पिकावर नांगर फिरविला. सोडगे यांनी १ एकरातील पीक उद्‌ध्वस्त करून टाकले आहे. दरम्यान, टाकवडे, जांभळी, हरोली परिसरातील शेतकरी असे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. तर दानोळी भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील टोमॅटोचा उठाव होत नसल्याने शेतातच टोमॅटो कुजून जाण्याची वेळ आली आहे.

कष्ट, खर्च आणि मिळकत याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. फुलकोबीचे दर पडल्यामुळे महेश सोडगे या शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. स्थानिक बाजारपेठेत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ फ्लॉवरला दोन रुपये प्रतिकिलो दर मिळाला. त्यामुळे येथील फ्लॉवर पिकवणारे सर्वच शेतकरी हतबलता व्यक्त करत आहेत.

यावेळी महेश सोडगे म्हणाले की, "एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च झाला आहे. किलोमागे केवळ २ रुपये दर मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खर्च आणि या पिकातून मिळणारी मिळकत या मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे नुकसानीत शेती करावी लागत आहे. असे सोडगे म्हणाले.

शिरोळ तालुक्यात यापूर्वीही उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवले गेले आहेत. शिरोळा हातकणंगले तालुक्यातील शेतकरी सामान्यत: स्थानिक बाजारपेठेत त्यांचा माल विकतात. त्यानंतर तो माल कोल्हापूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर येथील मोठ्या बाजारपेठेत जातो. आता या हंगामात शिरोळ तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर फुलकोबी पिकाची पेरणी झालेली आहे.

बाजारात मागणीपेक्षा जास्त फ्लॉवर आल्यामुळे त्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागले आहे. लागणीपासून तोडणीपर्यंत असंख्य अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांनी फ्लॉवर पीक घेतले. दर पडल्याने कष्टाने पिकवलेल्या पिकावर नांगर चालविण्याची वेळ आली आहे.

दानोळी गावचे पोपट शिंदे म्हणाले की, "दानोळीसह कोथळी, उमळवाड, निमशिरगाव, कवठेसार, तमदलगे येथे टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. टोमॅटोला दर मिळत नसल्याने काढणीही परवडेना झाली आहे. यावर्षी सुरुवातीला टोमॅटोला शंभर रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले; परंतु पीक आल्यानंतर दर २ रूपयापर्यंत ढासळल्यामुळे संकट ओढवले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे". असे शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

SCROLL FOR NEXT