Ramchandra Kokare and Dattatray Wawge Agrowon
ॲग्रो विशेष

Baramati Milk Union: बारामती दूध संघाच्या अध्यक्षपदी कोकरे, तर उपाध्यक्षपदी वावगे

Baramati Taluka Cooperative Producers Union Election Result: बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी संजय रामचंद्र कोकरे (रा.पणदरे) यांची, तर उपाध्यक्षपदी दत्तात्रेय सदाशिव वावगे (रा.सोनवडी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Team Agrowon

Malegaon News : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी संजय रामचंद्र कोकरे (रा.पणदरे) यांची, तर उपाध्यक्षपदी दत्तात्रेय सदाशिव वावगे (रा.सोनवडी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राज्याच्या सहकार क्षेत्रात बारामती दूध संघ अग्रगण्य समजला जातो. या संघाचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्ष श्री. कोकरे व उपाध्यक्ष श्री. वावगे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळाली. मावळते अध्यक्ष पोपटराव सोमनाथ गावडे व उपाध्यक्ष संतोष मारुती शिंदे यांनी ठरवून दिलेल्या कालावधीत राजीनामा दिल्याने वरील रिक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक-पुणे (सहकारी संस्था, दूध) सुधीर खांबायत यांच्या अधिपत्याखाली वरील निवडणूक पार पडली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माजी अध्यक्ष संभाजी होळकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विक्रम भोसले, दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.योगेश राणे, उपमहाव्यवस्थापक संजय भोसले आदी संचालक उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष कोकरे म्हणाले, की बारामती दूध संघ प्रशासन सहकाराच्या माध्यमातून दुग्धव्यवसायात समृद्धी आणेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ताजे, शुद्ध, स्वच्छ व आरोग्यदायी दूध संकलन करेल. यापुढे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनासाठी दूध पावडर सारखे नवीन प्रकल्प उभारणीसाठी ठोस धोरण राबविण्याचा मानस आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT