Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाचा पेरा अंतिम टप्प्यात

Kharif Season : सर्वाधिक मक्याची पेरणी झाली आहे. यंदाच्या आडसाली हंगामातील ऊस लागवडीचे नियोजन शेतकरी करू लागला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली असून, २ लाख २८ हजार १८९ हेक्टर म्हणजे ८९ टक्के पेरा झाला आहे. सर्वाधिक मक्याची पेरणी झाली आहे. यंदाच्या आडसाली हंगामातील ऊस लागवडीचे नियोजन शेतकरी करू लागला आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. जून महिन्यात २२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या खरीप हंगामात वेळेत पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या वेळेत सुरू झाल्या. जिल्ह्यात २ लाख २२ हजार १८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

आगाप मूग, मका, तूर, उडीद, सोयाबीन, भुईमूग यांसह अन्‍य पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मका पिकाचे सरासरी क्षेत्र ४०,७५३ हेक्टर असून ४४,९०७ हेक्टरवर म्हणजे ११० टक्के पेरणी झाली आहे. आगाप पेरणी केलेल्या सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे.

मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. मूग, उडीद पिकावर पाने खाण्याच्या अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन सुरू केले आहे. यंदाच्या आडसाली हंगामातील ऊस लागवडीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे.

येत्या आठवड्यापासून ऊस लागवडीस प्रारंभ केला जाणार आहे. जुलै महिन्यातील शनिवार (ता. १९) अखेर १११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. खरीप हंगामातील पेरा अंतिम टप्प्यात आला असून येत्या पंधरा ते वीस दिवसांत पेरणी पूर्ण होईल, अशी शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

तालुकानिहाय पेरणी दृष्टिक्षेप (क्षेत्र-हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज २१८८५

जत ७२३४६

खानापूर १४४९२

वाळवा २०९६०

तासगाव २८५०६

शिराळा १०७५०

कवठेमहांकाळ २१४४४

पलूस ५८०६

कडेगाव ९८२७

एकूण २२८१८९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT