Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : नांदेड जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी

Kharif Sowing : नांदेड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर जूनमध्ये मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. यानंतर अनेक भागात खरिपाच्या पेरण्यांची सुरुवात झाली.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या पावसामुळे खरिपातील पेरण्या ७१ टक्क्यांवर पोचल्या आहेत. यात सोयाबीन सर्वाधीक तीन लाख १६ हजार ७५८ हेक्टरवर कपाशी एक लाख ५३ हजार १४५ हेक्टर तर तर ४३ हजार हेक्टरवर पेरली गेली आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता. २७) एकूण पाच लाख ४१ हजार १५७ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर जूनमध्ये मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. यानंतर अनेक भागात खरिपाच्या पेरण्यांची सुरुवात झाली. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मृग नक्षत्रात पेरणी होत असल्याने शेतकरी सुखावले खरे परंतु यानंतर तब्बल बारा दिवस पावसाने ओढ दिली. यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या.

परंतु जून महिन्यांच्या २५ तारखेला जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केली. हा पाऊस सर्वच तालुक्यात झाला. जिल्ह्यातील तब्बल ३९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे पेरण्यांच्या कामांना वेग आला. हा पाऊस अधिक नसलातरी पेरणी योग्य झाल्याने जिल्ह्यातील सर्वचतालुक्यात पेरण्यांच्या कामांना वेग आला.

जिल्ह्यात आजपर्यंत ७१ टक्क्यांनुसार पाच लाख ४१ हजार १५७ हेक्टरवर खरिपातील पेरण्या आटोपल्या आहेत. यात सर्वाधीक तीन लाख १६ हजार ७५८ हेक्टरवर सोयाबीन, एक लाख ५३ हजार १४५ हेक्टरवर कपाशी, ४३ हजार ५८ हेक्टरवर तूर, १० हजार ३९२ हेक्टरवर उडीद, १० हजार ९१५ हेक्टरवर मुग, चार हजार ४९५ हेक्टरवर खरीप ज्वारीची लागवड झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ४१ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या आहेत. पुढील काही दिवसात पेरण्यांची सर्व कामे संपतील. यंदा दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यात कुठेही उद्भवले नाही.
- दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT