Summer Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : गेवराईत यंदा सव्वा लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित

Kharif Season 2025 : यंदाच्या खरिपात गेवराईतील बारा महसूल मंडलांत जवळपास सव्वा लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Team Agrowon

Beed News : यंदाच्या खरिपात गेवराईतील बारा महसूल मंडलांत जवळपास सव्वा लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मागील दहा दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाचा मुक्काम कायम असल्याने शेतीमशागतीच्या कामात विघ्न आल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. \

गेवराई तालुक्याचे १ लाख ४६ हजार ५२६ हेक्टर एवढे भौगोलिक क्षेत्र आहे. यात १ लाख ३४ हजार ७३४ पेरणीयोग्य क्षेत्र आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने खरिपाची साधारण १ लाख १० हजार हेक्टरवर पेरणी होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.

गेवराई तालुक्यातील शेतकरी सर्वाधिक कपाशीला पसंती देतात. गतवर्षी पेक्षा यंदा ऊस क्षेत्रात वाढ झाल्याने पाच ते सहा हजार हेक्टर कपाशी लागवडीत घट होईल असा अंदाज आहे. दुय्यम स्थान तुरीला त्यानंतर सोयाबीन तर मोसमी पावसानुसार मुगाची पेरणी होईल. दरम्यान वन्यजीवांच्या त्रासामुळे गेवराई तालुक्यात हंगामी बाजरीचे पीक जवळपास कालबाह्य झाले असून, उन्हाळी बाजरीला शेतकरी पसंती देत आहे.

पावसाचा धुमाकूळ

एप्रिल-मे महिना हा शेतकऱ्यांसाठी खरिपपूर्व मशागत करण्याचे महिने म्हणून ओळखण्यात येतात. मात्र, यंदा मार्च महिन्यापासून उन्हाचा पारा चाळीशी पार झाल्याने शेतीमशागतीला ब्रेक लागला होता. मे महिना प्रारंभ होताच यंदा शेतीमशागतीला प्रारंभ झाला होता. मात्र मागील दहा-बारा दिवसांपासून पावसाच्या धुमाकुळाने शेतीमशागतीवर विघ्न आले आहे. =

मॉन्सूनपूर्व पाऊस पडल्याने शेतकरी पेरणी योग्य पाऊस झाला असे समजून पेरणीची घाई करत आहेत. ही घाई शेतकऱ्यांना धोकादायक ठरणारी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणी करावी
- अभय वडकुते, तालुका कृषी अधिकारी गेवराई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT