Kharif Season Loss agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season Loss : पावसाने खरीप हंगाम गेला; बळिराजा ‘रब्बी’च्या लागला तयारीला

Agriculture Department : कृषी विभागाकडूनही रब्बी हंगामातील विविध पिके, आवश्यक निविष्ठा, मनुष्यबळ, यांत्रिकी अवजारांसह अन्य कामाचे नियोजन करण्यात येत आहे.

sandeep Shirguppe

Kharif Season Loss Farmers : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओल्या, तर कधी सुक्या दुष्काळामुळे शेती पिकावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. तर शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे. यावर्षी तर हातातोंडाशी आलेला खरीप पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतला. हार न मानता यंदा काहीतरी चांगले पदरात पडेल, अशी आस बाळगून शेतकरी नव्या उमेदीने यंदाच्या रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.

खरिपात झालेल्या नुकसानीचे ओझे पाठीवर घेत बळिराजा पुन्हा नवा आशावाद बाळगून रब्बीच्या तयारीत तो गुंतला आहे. कृषी विभागाकडूनही रब्बी हंगामातील विविध पिके, आवश्यक निविष्ठा, मनुष्यबळ, यांत्रिकी अवजारांसह अन्य कामाचे नियोजन करण्यात येत आहे. चांगल्या पावसाने जमिनीत पुरेशी ओल असल्याने वाफसा येईल, तशा पद्धतीने रब्बी पेरणीला सुरवात झाली आहे. अनेक शेतकरी तणाने भरलेले शेत रिकामे करण्यात गुंतले आहेत.

पेरणीच्या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. प्रामुख्याने गहू हरभऱ्यासह तालुक्याच्या तुजारपूर परिसरात रब्बी ज्वारीची पेरणी केली जाते. खते, तणनाशके व अन्य सुधारित बी-बियाणे खरेदीसाठी शेतकरी शहरांकडे धाव घेत आहेत.

कृषी निविष्ठा, बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना परवानाधारक निविष्ठा विक्रेत्याकडून खरेदी करावीत. बियाणे योग्य प्रतीचे असल्याची स्वतः खात्री करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. नामांकित व शासकीय कंपन्याचे बियाणे खरेदी करावे व त्या निविष्ठांचे पक्के बिल घ्यावे, तसेच कुठल्याही प्रकारचे बियाणे, खते याबाबत तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभाग, पंचायत समिती कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT