Nagar Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Deficit : कमी पावसामुळे खरिपाचे नुकसान

Latest Rain Update : या पावसाळ्यात अपुरा व अनियमित पाऊस झाल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. पावसातील खंडामुळे खरिपातील सोयाबीन या प्रमुख पिकाचे उत्पादन ५० टक्क्यांवर घटीचा अंदाज आहे.

Team Agrowon

Akola News : या पावसाळ्यात अपुरा व अनियमित पाऊस झाल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. पावसातील खंडामुळे खरिपातील सोयाबीन या प्रमुख पिकाचे उत्पादन ५० टक्क्यांवर घटीचा अंदाज आहे.

त्यामुळे पीकविमा कंपन्यांना अग्रिम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. दुसरीकडे प्रशासनाने नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अकोल्याची ५७, बुलडाणा ६०, तर वाशीम जिल्ह्याची पैसेवारी ६२ पैसे दाखवण्यात आलेली आहे.

यावर्षात जुलै महिन्यात पावसाला सुरुवात होऊन पेरणी झाली. याच महिन्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीही झाली होती. नदी-नाल्यांना पूर आल्याने शेती, पिके खरडून गेले. त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. याच काळात सोयाबीन या पिकाची फुलोरा, शेंगा धरण्याची अवस्था सुरू होती. खंडामुळे सोयाबीनचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. असे असतानाही या जिल्ह्यांची नजर अंदाज पैसेवारी सरासरी ५० पैशांवर जाहीर करण्यात आली आहे.

या पैसेवारीमुळे शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता आता मावळली आहे. पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम असे पैसेवारीचे समीकरण मांडले जाते.

अकोला जिल्ह्यात १०१२ महसुली गावे असून त्यातील ९९० गावे खरीप पिकांच्या लागवडी योग्य आहेत. यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५७ पैसे जाहीर करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पिकांची स्थिती विपरीत असल्याची वस्तुस्थिती आहे.

पैसेवारी आणि दुष्काळ

खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग, कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करीत असतो. पैसेवारीचा संबंध थेट दुष्काळी निकषांशी निगडीत मानला जातो. पाऊस कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम होतो. पैसेवारीच्या स्वरूपात ते मांडण्याचे हे सूत्र आहे.

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज, ऑक्टोबरमध्ये सुधारीत आणि डिसेंबर महिन्यात पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. पैसेवारीच्या आधारावर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. आता पुढील काळात येणाऱ्या पैसेवारीवर दुष्काळाची निश्चिती होऊ शकेल.

पैसेवारी आणि दुष्काळ

खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग, कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करीत असतो. पैसेवारीचा संबंध थेट दुष्काळी निकषांशी निगडीत मानला जातो. पाऊस कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम होतो. पैसेवारीच्या स्वरूपात ते मांडण्याचे हे सूत्र आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज, ऑक्टोबरमध्ये सुधारीत आणि डिसेंबर महिन्यात पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. पैसेवारीच्या आधारावर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. आता पुढील काळात येणाऱ्या पैसेवारीवर दुष्काळाची निश्चिती होऊ शकेल.

अकोला जिल्ह्यातील खरीप पैसेवारी

तालुका गावे पैसेवारी

अकोला १८१ ५५

अकोट १८५ ५७

तेल्हारा १०६ ५५

बाळापूर १०३ ५६

पातूर ९४ ६२

मूर्तिजापूर १६४ ५७

बार्शीटाकळी १५७ ५८

एकूण ९९० ५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT