Cloudy Weather  Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण

Weather Update : खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण पुन्हा तयार झाले आहे. मध्यंतरी तब्बल १५ ते २० दिवस ढगाळ वातावरण होते.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण पुन्हा तयार झाले आहे. मध्यंतरी तब्बल १५ ते २० दिवस ढगाळ वातावरण होते. गेले सहा-सात दिवस बऱ्यापैकी थंडी होती. पण पुन्हा विषम वातावरण तयार होत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला व मध्यात काही दिवस निरभ्र वातावरण होते. परंतु नोव्हेंबरच्या मध्यापासून ते आतापर्यंत ढगाळ वातावरण आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरणच नाही. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भिती आहे. कापसाची खेडा खरेदीदेखील थंड होऊ शकते. निरभ्र, कोरड्या वातावरणाची पिकांना गरज आहे.

डिसेंबरमध्ये खानदेशात अनेक भागात पाऊस झाला. यानंतर ढगाळ व पावसाळी वातावरण कायम होते. जळगावमध्ये चोपडा, धरणगाव, जळगाव, एरंडोल, पाचोरा आदी भागांत त्या वेळेस मध्यम पाऊस झाला. काही भागात हलकी गारपीट झाली.

नंदुरबार, धुळ्यात मोठी हानी झाली. धुळ्यातही धुळे, शिरपूर भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. आता पिके काढणी, मळीवर असताना पुन्हा ढगाळ वातावरण आहे. अनेक दिवस थंडी नव्हती. आता उष्णता व ढगाळ वातावरण आहे. शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे.

थंडीअभावी रब्बी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. आता हरभरा, दादर ज्वारी, अनेकांचे कलिंगड, केळी काढणीवर आहे. यामुळे नुकसान होऊ शकते. सततच्या विषम वातावरणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सकाळपासून ढगाळ, पावसाळी वातावरण राहत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT