Maha DBT Agroeon
ॲग्रो विशेष

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’च्या संथ चालीने केंद्रचालक त्रस्त

Maha DBT : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तयार केलेल्या ‘महाडीबीटी पोर्टल’वर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.

Team Agrowon

Akola News : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तयार केलेल्या ‘महाडीबीटी पोर्टल’वर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.

कागदपत्रे अपलोड करण्यासह नव्याने अर्ज भरणारे सीएससी केंद्रचालक, शेतकरी त्रस्त झाले आहेत. केंद्र चालकांना तासनतास या पोर्टलची लिंक सुरळीत होण्यासाठी प्रतीक्षा करीत बसावे लागत आहे.

राज्यातील शेतकरी ‘महाडीबीटी’वर विविध योजनांचा लाभ मिळवू शकतात. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम त्यांची नोंदणी करावी लागते. ऑनलाइन नोंदणी, अर्ज आणि विविध कृषी योजना आणि राज्य सरकारद्वारे प्रदान केलेल्या अनुदानांची माहिती घेणे व त्यासाठी नोंदणी करणे याद्वारेच होत असते.

शेतकरी पीकविमा, शेती उपकरणांसाठीचे अनुदान, सिंचन सुविधा आणि कृषी निविष्ठांसाठी ‘महाडीबीटी’द्वारे अर्ज करतात. गेल्या १५ दिवसांपासून हे पोर्टल संथ गतीने चालत असल्याचा फटका शेतकऱ्यांसह केंद्र चालकांना बसत आहे.

शेतकरी अनुदानाला मुकण्याची शक्यता
योजनांच्या लाभासाठी अर्ज मंजूर झालेल्यांची कागदपत्रे मुदतीत अपलोड होऊ शकत नाहीत. यामुळे काही जणांचा निवडीनंतर दिला जाणारा कालवधी संपुष्टात येत आहे.

शेतकऱ्यांच्या एका अर्जासाठी कधी-कधी संपूर्ण दिवस लागतो आहे. कागदपत्रे मुदतीत अपलोड करण्यात अपयश आल्यास विविध कृषी योजनांच्या अनुदानापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT