Seed Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Storage : बियाण्याची साठवण करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Seed Storage Benefits : सध्या बऱ्याच खरीप पिकांची काढणी झालेली आहे. बरेच शेतकरी पुढील हंगामात पीक लागवडीसाठी घरचेच बियाणे वापरतात.

Team Agrowon

Kharif Season : सध्या बऱ्याच खरीप पिकांची काढणी झालेली आहे. बरेच शेतकरी पुढील हंगामात पीक लागवडीसाठी घरचेच बियाणे वापरतात. त्यासाठी बियाण्याची योग्य प्रकारे साठवण करण्याचा मुख्य उद्देश बियाण्याची अंकुर क्षमता व जोम यात होणारी घट कमी करणे व किडींचा प्रादुर्भाव कमी करने हा आहे.

उबदार व दमट हवामानात सर्वच किटकांची वाढ झपाट्याने होते. साधारण ३० अंश सेल्सिअस उष्ण तापमान व ० ते ६५ टक्केहून जास्त आर्द्रता किटकांसाठी पोषक असते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आर्द्रता आणि तापमानाचा बियाण्यावर काय परिणाम होतो याबद्दल दिलेली माहिती पाहुया.

आर्द्रता आणि तापमानाचा बियाण्यावर काय परिणाम होतो

बियाण्यातील ओलाव्याच्या प्रमाणात होणाऱ्या प्रत्येक १ टक्का वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते. किंवा बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १ टक्क्याने कमी केल्यास बियाण्याचे आयुष्य दुपटीने वाढते. बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण अंदाजे ५ ते १४ टक्के दरम्यान असल्यास हा नियम लागू होतो.

बियाणे साठवणुकीच्या तापमानात होणाऱ्या प्रत्येक पाच अंश सेल्सियस वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते किंवा साठवणुकीचे तापमान पाच अंश सेल्सिअसने कमी केल्यास बियाण्याचे आयुष्य दुपटीने वाढते हा नियम सुद्धा साठवणुकीतील तापमान ० ते ५ अंश सेल्सियस दरम्यान असेल तेव्हाच लागू होतो.

आर्द्रतेमुळे बियाण्यात उष्णता वाढते व कुबट वास येऊ लागतो. बियाण्याच्या चवीत फरक पडतो त्यास कडवटपणा येतो आणि त्यावर बुरशी वाढते. असे बियाणे खाण्यासही योग्य राहत नाही. कोठारामध्ये जमिनीतून अगर खिडकीतून तसेच भिंतीतून ओल आल्यास बियाणे खराब होण्याची शक्यता असते.

वातावरणात आर्द्रता जास्त असल्यास साठवलेल्या बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाणही वाढते. आर्द्रतेचे प्रमाण ० ते २५ टक्के दरम्यान असल्यास, बियाण्यातील ओलावा अधिक जलद प्रमाणात वाढतो. २५ ते ७० टक्के दरम्यान मध्यम गतीने तर ७० ते १०० टक्के दरम्यान पुन्हा जलद गतीने वाढतो.

सर्वसाधारणपणे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्के पेक्षा जास्त वाढल्यास ते बियाण्याच्या अंकुरण क्षमतेला हानीकारक असते.

बियाण्याची चांगल्या प्रकारे व अधिक काळापर्यंत साठवणूक करण्यासाठी थंड वातावरण अधिक उपयुक्त असते. १५ अंश सेल्सिअसच्या खाली आणि ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान किडींसाठी हानीकारक असते.

साधारणपने तापमानात जसजशी वाढ होत जाते तसतसे बियाण्याच्या आयुष्यमानात घट होत जाते.

बियाण्याची साठवणूक प्राणवायु विरहित जागेत सुरक्षित करता येते. नत्र वायु हा इतर कुठल्याही वायू पेक्षा बियाण्यांचे साठवणुकीतील आयुष्यमान वाढविण्यास उपयुक्त ठरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT