KCR  Agrowon
ॲग्रो विशेष

K. Chandrshekhar Rao : तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव खरंच शेती करणार? ; व्हायरल ऑडिओ कॉलमुळे रंगली चर्चा

Telangana Agriculture News : शस्त्रक्रियेनंतर केसीआर सध्या आराम करत असून ते शेतीत रस घेत असल्याचे दिसत आहे. केसीआर यांचा खते-बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यासोबतची ऑडिओ कॉल समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना तेलंगाणाच्या सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी करत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला सत्तेतून खाली खेचले.

निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर मुख्यमंत्री राहिलेले केसीआर शेती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण या केसीआर खते-बियाणे विक्री करणाऱ्या विक्रत्यासोबत बोलत असल्याचा कथित ऑडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर केसीआर यांचा छोटा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्या खुब्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर केसीआर सध्या आराम करत असून ते शेतीत रस घेत असल्याचे दिसत आहे.

केसीआर यांचा खते-बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यासोबतची ऑडिओ कॉल समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ कॉलमध्ये केसीआर कृषी निविष्ठा विक्रेत्याशी बोलताना ऐकू येत आहे.

माध्यमांमधील बातम्यांनुसार, केसीआर यांनी निविष्ठा विक्रेत्याला फोन केला आहे. त्यात ते दुकानदाराला एरवल्ली येथील त्यांच्या फार्म हाऊसवर पुढील १० दिवसांत आवश्यक खते आणि बियाणे पाठविण्याच्या सूचना देत आहेत. केसीआर यांच्या व्हायरल कॉलमुळे केसीआर आता शेती करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

राजकारणात पुन्हा सक्रिय होणार

दरम्यान, केसीआर यांचा १७ फेब्रूवारीला वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसापासूनच केसीआर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. या निमित्ताने हैदराबाद येथील तेलंगाणा भवनामध्ये जय्यत तयारी सुरू आहे.

केसीआर तेलंगाणा भवनमध्ये आल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा निर्माण होईल आणि कार्यकर्ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना वाटत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT