Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Nursery : ऊस रोपवाटिकांना कर्नाटकचा आधार

Sugarcane Crop : दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस रोपांची मागणी घटल्याने डबघाईला आलेल्‍या पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस रोपवाटिकांना कर्नाटकने आधार दिला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस रोपांची मागणी घटल्याने डबघाईला आलेल्‍या पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस रोपवाटिकांना कर्नाटकने आधार दिला आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने कर्नाटकात मेच्या उत्तरार्धापासून उसाची लागवड अचानक वाढली. यामुळे रोपांच्या मागणीतही वाढ झाली. याचा सकारात्मक परिणाम रोपवाटिकांचे अर्थकारण सुधारण्यावर झाला आहे. प्रति रोपांमागे सरासरी ८० पैशांपर्यंत वाढ झाल्याने याचाही फायदा रोपवाटिका चालकांना होत आहे.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण फार कमी राहिले. त्यामुळे उसाच्या लागवडी लांबल्या. स्थानिक मागणीसह राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतील मागणी ठप्प झाली. त्यामुळे ऊस रोपवाटिकांतील तयार झालेली रोपे अक्षरशः जनावरांच्या चाऱ्यासाठी देण्यात आली. गुंतवणूक करून उभा केलेला रोपवाटिका व्यवसाय अनेकांना बंद करण्याची वेळ आली.

आर्थिक स्थिती बिकट होत असतानाच मेच्या मध्यापासून कर्नाटकमधून मागणी वाढू लागली याचा फायदा रोपवाटिका चालकांना होत आहे. अचानक मागणी वाढल्याने रोपांचा पुरवठा करताना दमछाक होत आहे. कर्नाटकात ०२६५ ऊस प्रजातींच्या रोपांना सर्वाधिक मागणी आहे. याबरोबरच मराठवाडा, विदर्भात ८६०३२, १०००१, १८१२१ या रोपांना मागणी आहे.

उगवण नसल्याने रोपे निर्मिती धीमी

मागणी आल्यानंतर रोपवाटिका चालकांनी रोप निर्मिती सुरू केली असली, तरी सध्याचे हवामान रोपांच्या उगवणीसाठी चांगले नसल्याचे रोपांची वाढ अत्यंत धीम्या प्रमाणात होत असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. यामुळे रोपांसाठी ऊस मिळविण्‍यापासून ती वेळेत तयार करून देणे हे आव्हान ठरत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस रोपवाटिकांची शेतकऱ्यांबरोबर राज्याच्या अन्य भागांतील रोपवाटिका चालकांकडूनही मागणी आहे. ही मागणी मोठी आहे. अन्य भागातील रोपवाटिका पश्‍चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांकडून रोपे खरेदी करून ती स्थानिक ठिकाणी उपलब्ध करून देत असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.

पावसावर मागणी निर्भर

पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात पुरेसा पाऊस नसल्याचे आडसाली लागवडी धीम्या होत आहे. पुराचा धोका असल्याने अनेक शेतकरी सप्टेंबरपर्यंत लागवड करण्याच्या स्थितीत नाही. जरी पुरेसा पाऊस झाला तरी लागवडी वाढतील. मराठवाडा, विदर्भ, दक्षिण सोलापूर, कर्नाटक भागांतून बरोबरच गुजरातेतील कारखान्‍यांकडूनही मागणी वाढेल, असा आशावाद रोपवाटिका चालकांचा आहे.

रोपांना वाढणारी मागणी आर्थिक अडचणीतील रोपवाटिका चालकांना आशेचा किरण दाखवत आहे. चांगला पाऊस झाल्यास गेल् ‍यावर्षी झालेला तोटा काही प्रमाणात तरी भरून निघण्याची शक्यता आहे.
- प्रल्‍हाद पवार, रोपवाटिका चालक, जांभळी, जि. कोल्हापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT