ॲग्रो विशेष

Water Management : पाणी स्वयंपूर्णतेबाबत कऱ्हाटीचे नाव देशात मोठे करणार

Water self-sufficiency : दिवाकर धोटे ः अधिकाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान कार्यक्रम

Team Agrowon

Baramati News : सुपे, ता. बारामती ः काऱ्हाटी गावाने अटल भूजल स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. पाण्याविषयी चांगलीच जागृती झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन आला आहे. पाण्याच्या स्वयंपूर्णतेबाबत गावाचे नाव देशात मोठे करायचे. आता थांबायचे नाही. कामाला लागा, असे गौरोवोद्गार वरिष्ठ भू वैज्ञानिक दिवाकर धोटे यांनी काऱ्हाटी (ता. बारामती) येथे ग्रामस्थांशी बोलताना काढले.

काऱ्हाटी गावाने अटल भूजल ग्रामसमृद्ध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे रुपये ५० लाखांचे बक्षीस मिळवले. यासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभलेल्या अधिकाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते. या कार्यक्रमात धोटे बोलत होते. अध्यक्षस्थानी शैलजा लोणकर होत्या. या वेळी सहायक भूवैज्ञानिक सुजाता सावळे, शुभांगी काळे, अमित जाधव, ज्ञानेश्वर पांगारे, जयेश हेडगिरे, सरपंच दीपाली लोणकर, उपसरपंच गणेश शिंदे, दादा खंडाळे, के. एस. लोणकर, के. के. वाबळे, योगेश लोणकर, त्रिंबक चांदगुडे, दत्तात्रेय साळुंके, विठ्ठल जाधव, ग्रामसेवक पूजा गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

धोटे म्हणाले, की २०२० च्या दरम्यान अटल भूजल योजना आली. कोरोना दरम्यान त्याची गती कमी झाली होती. प्रोत्साहन निधी मिळाल्यानंतर योजनेने चांगलीच गती घेतली. खोलवर गेलेली भूजल पातळी कशी वाढवता येईल, टिकवता येईल याविषयी जनजागृती झाली. पाण्याचे महत्त्व कळाले. बांधबंदिस्ती, रिचार्ज शाफ्ट कुठे घ्यायचे. पाणी कसे टिकवून ठेवता येईल, याविषयी अनेकांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्याचा फायदा यापुढे गावाला होणार आहे.

तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, की सार्वजिक कामासाठी गाव गट-तट विसरून एका विचाराने एकत्र येते. त्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहात नाही. गावातील अनेक जणांनी झोकून देऊन काम केले. पाण्याच्या कामांसाठी झपाटल्यासारखी गावकऱ्यांनी कामे केली. त्यामुळेच गावाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, शेतकरी सुनील नेवसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गजानन लोणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश लोणकर यांनी केले. दीपाली हिरवे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT