Washim News : सन १९७७ ते २०२४ या ४६ वर्षांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कारंजा मतदार संघाला प्रथमच महिला आमदार मिळाल्या आहेत. या वेळी श्रीमती सईताई डहाके यांचा भाजपच्या चिन्हावर विजय झाला.
कारंजा मतदारसंघात सन १९७८ मध्ये अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकचे अरविंद कमलाकर देशमुख, १९८० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रामकृष्ण गंगाराम राठी, १९८५ मध्ये काँग्रेसचे अनंत विठ्ठल देशमुख होते.
त्यानंतर १९९० मध्ये शिवसेनेचे गुलाबराव गावंडे, १९९५ मध्ये आणि १९९९ मध्ये पहिल्यांदा अपक्ष तर नंतर काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर, २००४ मध्ये शिवसेनेचे राजेंद्र पाटणी, २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे राजेंद्र पाटणी यांनी कारंजा मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले.
परंतु गेल्या ४६ वर्षांत या मतदार संघाला महिला आमदार मिळाल्या नव्हत्या. अखेर २०२४ च्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार श्रीमती सईताई डहाके या प्रचंड बहुमताने निवडून आल्या.
आता या मतदार संघाला पहिल्या महिला आमदार मिळाल्या. विशेष म्हणजे सईताई डहाके यांचे पतीसुद्धा या मतदार संघात २००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. आता सईताई डहाके या प्रतिनिधित्व करणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.