Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : खानदेशात कांदेबाग केळीची लागवड सुरूच

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कांदेबाग म्हणजेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या केळी बागांची लागवड सुरूच आहे. ही लागवड यंदा वेगात होत असून, क्षेत्र काहीसे वाढू शकते, असाही अंदाज आहे.

कांदेबाग केळीला मागील हंगामात चांगले दर मिळाले. परदेशात निर्यातही झाली. यंदाही दर टिकून आहेत. कांदेबाग केळीचा या व मागील हंगामात मिळून सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.

हा दर मृग बहरात लागवडीच्या बागांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच कापूस, कलिंगड या पिकांत फारसा नफा राहत नसल्याने किंवा दरही हवे तसे नसल्याने शेतकरी केळी लागवडीकडे वळत आहेत. नव्याने किंवा प्रथमच अनेक शेतकरी केळीची लागवड करीत आहेत. ही लागवड जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर, यावल, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव आदी भागात सुरू आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही लागवड केली जात आहे. खानदेशात दरवर्षी नऊ ते साडेनऊ हजार हेक्टरवर कांदेबाग केळीची लागवड केली जाते. परंतु ही लागवड यंदा १० हजार हेक्टरचा टप्पा ओलांडणार आहे. कांदेबाग केळीची लागवड चोपडा, शिरपूर तालुक्यात वाढू शकते. तसेच जळगाव, जामनेर तालुक्यातही किंचित वाढ होईल, असे दिसत आहे.

तापी, गिरणा, अनेर नदीच्या क्षेत्रात ही लागवड होत आहे. लागवडीला या आठवड्यात वेग आला आहे. कारण वातावरण काहीसे कोरडे आहे. पाऊस नसल्याने लागवडीत अडथळा नाही. सऱ्या पाडून लागलीच कंद, रोपांची लागवड शेतकरी उरकून घेत आहेत.

कंदांनाही पसंती

रोपे आणि कंदांचा व्यवस्थित पुरवठा होत आहे. रोपेही मुबलक आहेत. सुमारे पाच कंपन्या उतिसंवर्धित केळी रोपांचा खानदेशात पुरवठा करीत आहेत. तसेच अनेक शेतकरी कंदांचा उपयोग लागवडीसाठी करीत आहेत. त्यात ग्रॅण्ड नैन वाणाच्या कंदांची लागवड अधिक होत आहे.

तसेच काही शेतकरी आंबेमोहोर, सातमासी, महालक्ष्मी वाणांच्या कंदांच्या लागवडीसदेखील पसंती देत आहेत. दर्जेदार कंदांचे दर तीन ते चार रुपये प्रतिकंद असे आहेत. तसेच केळीच्या उतिसंवर्धित रोपांचे दर १४, १५ ते १६ रुपये प्रतिरोप (वाहतूक खर्चासह) असे आहेत.

यंदा रोपांचे दर स्थिर आहेत. पुढील लागवडीसाठीदेखील विविध कंपन्या रोपे पुरवठ्यासंबंधी आगाऊ नोंदणी करून घेत आहेत. त्यासही बऱ्यापैकी प्रतिसाद खानदेशात मिळत आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT