Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain: जुन्नर, मुळशी परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा

Crop Damage: पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि मुळशी परिसरात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अचानक अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला. कांदा, भुईमूग आणि इतर उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

गणेश कोरे

Pune News: जुन्नर व परिसरातील गावांतून रविवारी (ता.१३) आणि सोमवारी (ता.१४) सलग दोन दिवस वादळी वारा, तसेच मेघगर्जनेसह गारांचा जोराचा पाऊस झाला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतातील कांदा व उन्हाळी भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करावेत, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

जुन्नर, लेण्याद्री, गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ, कबाडवाडी, राजूर आदी भागांत पावसाचा जोर अधिक होता. सुमारे दोन तास झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले होते. सध्या शेतात कांदा काढणीची कामे सुरू आहेत.

काढणीस आलेला कांदा व शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे, तसेच उन्हाळी भुईमूग पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी स्वप्नील दप्तरे यांनी सांगितले. अचानक आलेल्या पावसाने जुन्नरच्या आठवडे बाजारात विक्रेते, तसेच ग्राहकांची धावपळ उडाली. महसूल विभागाकडे मढ येथे २६ मिलिमीटर, तर जुन्नरला ७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

मुळशी तालुक्यात मुठा खोऱ्यात रविवारी (ता. १३) सायंकाळी ६ वाजल्यापासून जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतातील उभी पिके व आंब्याचे मोठे नुकसान झाले. तर आटाळवाडीत ७ विजेचे खांब पडले असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे. रविवारी दुपारपर्यंत मुठा खोऱ्यात मध्यम पाऊस झाला होता.

सायंकाळी ६ वाजल्यानंतर जोरदार वारे वाहू लागले. तसेच मोठ्या गारांचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकरी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक शेतकरी कांदा काढणी करत होते. त्यांना कांदा झाकून ठेवणे, वाहून नेण्यासाठी धावपळ करावी लागली. काही शेतकऱ्यांचा काढलेला कांदा, वाल, मसूर, हरभरा भिजल्याने नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT