Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

Water Level In Dam : मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात एकूण ९५५.५२ दलघमी म्हणजे ३३.१४ टीएमसी उपयुक्त पाणी साठवले गेले आहे. त्यामुळे प्रकल्पातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ४४.०१ वर पोहोचली आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाण्यासाठा ७९.५६ टीएमसीवर गेला आहे. सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ३३.७४ टीएमसी उपयुक्त पाणी साठले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात एकूण ९५५.५२ दलघमी म्हणजे ३३.१४ टीएमसी उपयुक्त पाणी साठवले गेले आहे. त्यामुळे प्रकल्पातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ४४.०१ वर पोहोचली आहे.

निम्न दुधना प्रकल्पात ३.०४ टीएमसी उपयुक्त पाणी साठले असून, प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ३५.५२ इतकी झाली आहे. येलदरी प्रकल्पात ४१०.९७ दलघमी अर्थात १४.५१ टीएमसी म्हणजे ५०.७५ टक्के उपयुक्त पाणी साठले आहे. सिद्धेश्‍वर प्रकल्पात १७.४६ दलघमी, अर्थात ०.६२ टीएमसी उपयुक्त पाणी साठले आहे.

या प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी केवळ २१.५६ टक्के इतकी आहे माजलगाव प्रकल्पाचीही तीच अवस्था असून प्रकल्पात ३५.६० दलघमी, अर्थात केवळ १.२६ टीएमसी उपयुक्त पाणी साठले आहे. या प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ११.४१ टक्के इतकी झाली आहे.

मांजरा प्रकल्पात ४८.३९ दलघमी, अर्थात १.७१ टीएमसी म्हणजे २७.३४ टक्के उपयुक्त पाणी साठले आहे. पैनगंगा प्रकल्पात १७.६७ टीएमसी उपयुक्त पाणी साठले असून, या प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी ५१.९१ इतकी झाली आहे. मानार प्रकल्पात ७२.६४ दलघमी, अर्थात २.५६ टीएमसी उपयुक्त पाणी साठले आहे.

या प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ५२.५६ टक्के आहे निम्न तेरणा प्रकल्पात २.२६ टीएमसी उपयुक्त पाणी साठले असून त्याची टक्केवारी ७०.१८ इतकी आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ०.६६ टीएमसी उपयुक्त पाणी असून, या प्रकल्पाच्या उपलब्ध पाणी साठ्याची टक्केवारी २३.२२ इतकी आहे.

सीना कोळेगाव प्रकल्पात १.५३ टीएमसी उपयुक्त पाणी साठले असून प्रकल्पाच्या उपयुक्त पाण्यासाठीची टक्केवारी ४८.३६ इतकी असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT