HSC Board Result Agrowon
ॲग्रो विशेष

12th Result : बारावीच्या निकालात जामखेड, संगमनेरची बाजी

Ahilyanagar 12th Result : शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान जिल्ह्यात राबवले. त्याचा परिणाम म्हणून परीक्षा कडक केल्याने निकालही कडक लागल्याचे पाहायला मिळत आहे.

sandeep Shirguppe

Ahilyanagar : अहिल्यानगरचा बारावीचा निकाल ८६.३४ टक्के लागला आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. भरारी पथके, बैठी पथके, सीसीटीव्ही कॅमेरे अशा विविध पथकांची नेमणूक करण्यात आली होती. शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान जिल्ह्यात राबवले. त्याचा परिणाम म्हणून परीक्षा कडक केल्याने निकालही कडक लागल्याचे पाहायला मिळत आहे.

बारावीच्या परीक्षेचा सोमवारी (ता. ५) जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहिल्यानगर जिल्हा टक्केवारीत नव्वदीपार करत असायचा, मात्र यंदाच्या निकालात अहिल्यानगर जिल्ह्याची घसरगुंडी झाल्याचे दिसत आहे. विभागात जिल्हा तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. जिल्ह्याचा निकाल ८६.३४ टक्के लागला. यात जामखेड व शेवगाव तालुक्यांनी आघाडी घेत नव्वदी ओलांडली आहे. इतर सर्व तालुक्यांची नव्वदी गाठताना दमछाक झाल्याचे दिसते.

राज्य माध्यमीक व उच्च माध्यमीक मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा जिल्ह्याचा निकाल तब्बल ७ टक्क्यांनी घसरला. मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा यंदाही कायम राहिली. या वर्षी बारावीची परीक्षा ३२ हजार ८६६ मुले व २७ हजार ६५ मुली, अशा एकूण ६० हजार ९३१ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातून २७ हजार ३९ मुले (८१.४१ टक्के) व २५ हजार ३९ मुली (९२.५१ टक्के) असे एकूण ५२ हजार ६०९ विद्यार्थी (८६.३४ टक्के) उत्तीर्ण झाले. मागील वर्षीप्रमाणे यंदा पुणे विभागात नगर जिल्हा तिसऱ्या स्थानी फेकला गेला.

जिल्ह्यात जामखेड तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९४.८९ टक्के लागला. त्यानंतर संगमनेर (९३.७० टक्के) व राहाता (८९.८२ टक्के) तालुक्यांचा क्रमांक लागतो. सर्वांत कमी निकाल शेवगाव (७६.६३ टक्के) तालुक्याचा लागला. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.६० टक्के, कला शाखेचा निकाल ६४.७३ टक्के तर वाणिज्य ८६.२८ टक्के लागला आहे.

तालुकानिहाय निकाल असा...

अकोले ८८.४२ टक्के

जामखेड ९४.८९ टक्के

कर्जत ८७.१५ टक्के

कोपरगाव ८८.२२ टक्के

नगर ८५.९३ टक्के

नेवासे ७७.३१ टक्के

पारनेर ८६.२१ टक्के

पाथर्डी ८२.२९ टक्के

राहाता ८९.८२ टक्के

राहुरी ८६.५५ टक्के

संगमनेर ९३.७० टक्के

शेवगाव ७६.६३ टक्के

श्रीगोंदे ८८.५९ टक्के

श्रीरामपूर ८५.५१ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT