Jalyukta Shivar Agrowon
ॲग्रो विशेष

Jalyukta Shivar Scheme : जलयुक्त शिवार अभियान २.० प्रभावीपणे राबवा

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान २.० या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Aurangabad jalyukt Shiwar News : सात दिवसांच्या आत समिती स्थापन करून जलयुक्त शिवार २. ० अभियान (Jalyukta Shivar Scheme) यांच्या कामाला सुरवात करावी. तत्काळ कार्यवाहीसाठी गावपातळीवर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक गाव आराखडा तयार करण्याचे नियोजन करून आर्थिक नियोजनाप्रमाणे पाणलोट (Watershed) घटक विचारात घ्यावा.

शेती, जनावरे, घरगुती वापर यासाठी पाण्याचे समितीने समन्वयाने नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केली.

जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून प्रभावीपणी राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान २.० या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, सिल्लोडचे सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी सूरज शिंदे, विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण प्रशांत वरुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस.तौर, एन.जी.जाधव, उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियान २.० या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावामध्ये मृद व जलसंधारणची कामे करण्यात येणार असून शिवारफेरी, जलसाक्षरता, लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा आणि प्रत्येक तालुकानिहाय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

गावागावात जलयुक्त शिवाराने शेतकऱ्यांना पाण्याचे, योग्य नियोजन करून आर्थिक उत्पन्नवाढी बरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे अभियान राबवावा. असे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी सांगितले.

६६ गावातील जलसंधारणाची माहिती सादर...

जिल्हा पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा जिल्हा जलसंधारण अधिकारी सूरज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर सादर केला.

या समितीत पाणलोट क्षेत्र विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवालातील त्रुटी दूर करून जिल्ह्यात निवड केलेल्या ६६ गावात जलसंधारणाची नाला बंडिंग, गॅबियन बंधारे, सिमेंट नाला बांध या कामाची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.

जिल्ह्यातील खुलताबाद आणि वैजापूर या तालुक्यातील प्रत्येकी दोन क्लस्टर तसेच पैठण, औरंगाबाद, गंगापूर तालुक्यातील प्रकल्पावर करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT