Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : जळकोटला सलग पाचव्या दिवशी पावसाने झोडपले

Crop Damage : तालुक्यात सलग पाच दिवस अवकाळी पाऊसाने कहर केला असून वारे, विजांच्या कडकडासह झालेल्या मुसळधार पावसाने अंबा उत्पादकांची झोप उडविली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Latur News : तालुक्यात सलग पाच दिवस अवकाळी पाऊसाने कहर केला असून वारे, विजांच्या कडकडासह झालेल्या मुसळधार पावसाने अंबा उत्पादकांची झोप उडविली आहे. रविवारी (ता. १४) काढणी बाकी असलेल्या रब्बी पिकांतील ज्वारी, गहू, आंब्याचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. रोहिना, औराद शहाजानी व औसा शहर परिसरातही पाऊस झाला.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नसून शेतकऱ्यांनी जावे कुणाकडे, असा प्रश्न पडला आहे. चार दिवसांपासून वारे, अवकाळी पाऊस झोडपत असून अजूनही नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. सलग पाच दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे.

रब्बी पिकांतील उभी ज्वारी व कापून ठेवलेले ज्वारी, आंब्यांच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. हाताला आलेला अंबा वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आंब्याच्या झाडाचे ऐशी टक्के आंबे गळून गेल्यामुळे आंबा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणले.

दरम्यान, रविवारी (ता. १४) सायंकाळपासून आभाळात काळे ढग घेऊन विजांचा कडकडाट, सुसाट वारे होते. त्यामुळे आठपासून वीज गुल झाल्याने तालुक्यातील नागरिकांना रात्र अंधारात काढण्याची वेळ आली. सायंकाळी सात ते आठपर्यंत मुसळधार पाऊस होता. त्यामुळे अनेक ठिकणी जमिनीत पाणी साचले होते.

उन्हाळ्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने विहीर, बोअरची पाणीपातळी वाढण्यात थोडीफार मदत होणार आहे. महावितरणकडून सकाळी सहापासून दुरुस्ती काम सुरू होते. दुपारी दोन वाजता शहरातील वीजपुरवठा सुरुळीत सुरू झाला होता.

मात्र ग्रामीण भागातील काम सुरू असल्यामुळे सायंकाळी पाचपर्यंत वीजपुरवठा सुरुळीत होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले. तालुक्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांच्या व आंबा बागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार कधी, असा प्रश्न आंबा उत्पादक व शेतकरी करत आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील रोहिना, औराद शहाजानी व औसा शहर परिसरातही रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT