Jalgaon Rain News Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Rain News : खानदेशात पावसाची हुलकावणी

Rain Update : खानदेशात अपवाद वगळता हलका ते मध्यम पाऊस सोमवारी (ता. २६) सकाळी व दुपारी झाला. अनेक भागांत तुरळक सरी कोसळल्या.

Team Agrowon

Jalgaon Rain Update : खानदेशात अपवाद वगळता हलका ते मध्यम पाऊस सोमवारी (ता. २६) सकाळी व दुपारी झाला. अनेक भागांत तुरळक सरी कोसळल्या. पेरणीयोग्य पाऊस कुठेही झाला नाही. पावसाने हूल दिल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

रविवारपासून (ता. २५) खानदेशात वातावरणात बदल झाला आहे. पाऊस येईल, याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सकाळपासून ढगाळ, पावसाळी वातावरण असते.

रविवारी तुरळक पाऊस धुळे, जळगाव भागांत झाला. परंतु कुठेही पेरणीयोग्य पाऊस रविवारी व सोमवारी झालेला नाही. मंगळवारीदेखील (ता. २७) ढगाळ वातावरण कायम होते.

सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास धुळ्यातील धुळे, शिरपूर, साक्री, जळगावमधील धरणगाव, चोपडा, जळगाव, भुसावळ, जामनेर, रावेर भागांत मध्यम ते हलका पाऊस झाला. सुरुवातीला सुसाट वारा होता. नंतर पावसाला सुरुवात झाली. पण जोरदार पाऊस बरसला नाही.

फक्त पाच ते सहा मिनिटे मध्यम पाऊस झाला. नंतर अधूनमधून हलका पाऊस जळगाव, धरणगाव व इतर भागांत येत होता. दुपारी काही वेळ शेतीकामे थांबली. पण पाऊस थांबताच कापूस पिकातील तणनियंत्रण व इतर कामे वेगात सुरू झाली. दुपारी १२.३० नंतर सुसाट वारा सुरू झाला. ढगाळ वातावरणही कमी झाले.

पावसाचे आगमन सोमवारी सायंकाळी व रात्रीही झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु पेरणीयोग्य पाऊस या महिन्यात एकदाही झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे. कडधान्य पेरणी कमी होईल, असे दिसत आहे.

पावसाची टक्केवारी कमीच

खानदेशात मागील वर्षी जूनमध्ये अनेक भागात पाऊस झाला होता. सरासरीच्या २८ टक्के पाऊस जूनच्या तिसऱ्या आठवड्यात झाला होता. परंतु यंदा सरासरीच्या १० टक्केही पाऊस झालेला नाही.

तसेच मागील वेळेस कमाल शेतकऱ्यांची सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, कापूस व इतर पिकांची पेरणी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत झाली होती. ती यशस्वीदेखील झाली होती. परंतु यंदा पावसाअभावी पेरणी किंवा धूळपेरणीदेखील अपवाद वगळता झालेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT