Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Refund : कापूस, सोयाबीन पीकविम्याच्या परताव्यांची जळगावात प्रतीक्षा

Crop Loss : खरीप हंगामात अतिपावसात नुकसान झाले. यात अनेक कापूस, सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खरीप हंगामात अतिपावसात नुकसान झाले. यात अनेक कापूस, सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले आहे. परंतु पात्र असूनही अजूनही पीकविमा परतावे मिळालेले नाहीत. सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात अतिपावसामुळे कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशात पीकविमा योजनेतून मंजूर परतावे किंवा नुकसानीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या, शेतकरी संघटनेने या प्रश्नी आंदोलनाची भूमिका घेतली, निवेदन दिले, पण प्रशासन, विमा कंपनीने दखल घेतलेली नाही. शेतीमालाचे नुकसान भरून निघावे, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना काही हजार रुपयांची मदत मिळविण्यासाठी विमा कंपन्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पीकविम्याची परतावा रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ५५ हजार ७७९ शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात ८७ महसूल मंडळांपैकी कमाल भागात अतिपाऊस पडल्यामुळे ‘नुकसान झाले. परंतु यंदा कुठेही अग्रिम पीकविमा परतावा मिळाला नाही.

विमाधारक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर पीकविमा कंपनीकडे वेळीच पीक नुकसानीच्या तक्रारी नोंदविल्या. विमा कंपनीच्या प्रतिनिधी यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले.

पण अनेक महिने झालेले असतानाही विमाधारक शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम किंवा परतावा अजूनपर्यंत मिळाला नाही. पीकविमा हप्ता विशिष्ट मुदतीत भरावा लागतो. पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीनंतर ७२ तासांच्या आत तक्रार दाखल करावी लागते. परंतु भरपाई देताना कुठलेही वेळेचे बंधन विमा कंपनी पाळत नाही, असा आरोप शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT