Dr. Archana Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Management : शेतीमाल विक्री व्यवस्थापनातील ताळमेळ साधणे गरजेचे : डॉ. कडू

Dr. Archana Kadu : शेतकऱ्यांना पीकनिहाय संघटितपणा, एकात्मिक पद्धतीचा अवलंब आणि समाज माध्यमातील अत्याधुनिक संसाधनाचा प्रभावी वापर करीत शेतीमालाची विक्री करण्याचा सल्ला डॉ. अर्चना कडू यांनी दिला.

Team Agrowon

Nagpur News : शेतकरी शेतीमाल पीकवितो मात्र विक्री व्यवस्थापनातील ताळमेळ साधता न आल्यामुळे अपेक्षित आर्थिक लाभापासून वंचित राहतो, असे सांगताना ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांनी शेतकऱ्यांना पीकनिहाय संघटितपणा, एकात्मिक पद्धतीचा अवलंब आणि समाज माध्यमातील अत्याधुनिक संसाधनाचा प्रभावी वापर करीत शेतीमालाची विक्री करण्याचा सल्ला दिला.

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, काटोल, मग्नेट प्रकल्प, महाराष्ट्र राज्य विपणन महामंडळ, पुणे, आत्मा कृषी विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे प्रक्षेत्रावर आयोजित ‘संत्रा - उत्तम कृषी पद्धती’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्‌घाटक, प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थितांना मार्गदर्शन करीत होत्या.

नागपूर विभागात जवळपास तीस हजार एकर क्षेत्रावर संत्रा फळ पिकाची लागवड झालेली असून प्रगत तंत्रज्ञनाने लागवडी खालील क्षेत्रदेखील वाढत आहे. गत काही वर्षांपासून हवामानातील झालेल्या बदलामुळे या भागातील संत्रा उत्पादकला खर्च वजा जाता आर्थिक मोबदला कमी प्रमाणात मिळाला आहे.

तसेच लागवडीमध्ये काही समस्या जसे, अन्न द्रव्ये कमतरता, सिट्रस सिला, काळी माशी कीड, डींक्या, ग्रीनिंग व कोळशी अशा समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी त्याचा प्रसार व्हावा याकरिता तसेच उत्पादित मालाचे योग्य साखळी व्यवस्थेद्वारे विपणन, मूल्यवर्धन जाणून घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. अर्चना कडू यांनी संत्रा पिकाची लागवड करताना पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. डॉ. मेघा डहाळे, अजय कडू यांनी मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी मनोज जवंजाळ यांनी बदलत्या हवामानानुसार शेतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अशी विनंती केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT