Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Law: किमान हमीभाव कायद्यासाठी एकत्रित लढा उभारणे गरजेचे

Farmer Protest: देशभरातील शेतकरी संघटनांनी किमान हमीभाव कायद्याच्या लढ्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील बैठकीत कर्जमुक्ती, पीकविमा, आणि भूसंपादन कायद्यावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात एकसंघ लढा उभारण्याचा संकल्प करण्यात आला.

Team Agrowon

New Delhi News: देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी एकजूट दाखविल्याने केंद्र सरकारला तीन काळे कृषी कायदे रद्द करणे भाग पडले. त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारला किमान हमीभाव कायदा व सध्या अमेरिकेकडून ज्या पद्धतीने साम्राज्यवाद निर्माण करून शेती उत्पादनावर आयात- निर्यातीमघ्ये चुकीचे धोरण अवलंबले जात आहे त्याकरिता सर्वांनी एकत्रित येऊन लढा उभारणे गरजेचे आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

दिल्ली येथील मीनाबागमधील बिहारचे माकपचे खासदार राजाराम सिंह यांच्या निवासस्थानी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्या वेळी शेट्टी बोलत होते. या बैठकीत किमान हमीभाव कायदा, संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा, भुमि अधिग्रहण कायदा या प्रमुख विषयांवर संपूर्ण देशात यात्रा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी शेतीपासून परावृत्त होऊ लागले आहेत. कृषिप्रधान देशाच्या दृष्टीने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. याकरिता देशातील सर्व संघटनानी सर्वपक्षीय खासदारांना एकत्रित करून त्यांचा दबावगट निर्माण करून केंद्र सरकारला काही धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणे गरजेचे असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे सरदार व्ही. एम. सिंग, जनकिसान आंदोलनाचे प्रमुख योगेंद्र यादव, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, बिहारचे खासदार सुदामा प्रसाद, प्रेमसिंग गेहलावत, मा. खासदार हानण मौला, डॉ. सुनिल्लम, भुलैनसिंह रजेवाल यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT