Animal Feed Bag  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Feed Ingredients : पशुखाद्याच्या पिशवीवर घटक नोंद करणे बंधनकारक

Animal Feed Bag Update : पशुखाद्याच्या पिशवीवर त्यातील घटक, ऊर्जा, क्रूड प्रोटीन, क्रूड फॅट, क्रूड फायबर यांसह विविध प्रकारची माहिती न नोंदविणाऱ्या पोल्ट्री खाद्य उत्पादकांना नोटीस बजावत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : पशुखाद्याच्या पिशवीवर त्यातील घटक, ऊर्जा, क्रूड प्रोटीन, क्रूड फॅट, क्रूड फायबर यांसह विविध प्रकारची माहिती न नोंदविणाऱ्या पोल्ट्री खाद्य उत्पादकांना नोटीस बजावत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारपासून (ता. १८) शासन निर्णय लागू झाल्यापासून एक महिन्याच्या आत यासंबंधीची प्रक्रिया कंपन्यांना करावी लागणार आहे.

पशुखाद्यातील मका किंवा इतर घटकांच्या दरात जागतिकस्तरावर वाढ झाल्याचा हवाला देत खाद्य उत्पादक कंपन्यांकडून लगेच पोल्ट्री खाद्याच्या दरात वाढ केली जात होती. ब्रॉयलर चिकन तसेच अंड्यांच्या दरात घट झाली असताना नेमकी त्याचवेळी ही दरवाढ करण्यावर कंपन्यांकडून पुढाकार घेतला जात होता. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांच्या उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होत नव्हती.

त्यामुळेच पोल्ट्री खाद्याच्या पिशवीवर त्यातील घटक नमूद करण्याबाबत सक्‍ती कंपन्यांना करावी, अशी मागणी पोल्ट्री योद्धा फेडरेशनने केली होती. राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीच्या बैठकीत देखील हा मुद्दा सातत्याने उपस्थित करणात आला. त्याची दखल घेत यापूर्वी वारंवार पोल्ट्री फीड उत्पादक कंपन्यांना खाद्यातील घटकांची माहिती नोंदविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र कंपन्यांनी दुर्लक्ष केले. आता कंपन्यांना नोटीस बजावत कारवाई केली जाणार आहे.

या बाबींची असावी माहिती

कुक्‍कुट खाद्याच्या बॅगवर खाद्यातील ऊर्जा, क्रूड प्रोटीन, क्रूड फॅट, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, ऍश, मॉइश्‍चर हे घटक नोंदवावे लागणार आहेत. अन्न घटकांसोबतच उत्पादक संस्थेचे नाव, पत्ता, उत्पादन परवाना क्रमांक, कुक्‍कुट खाद्य उत्पादनाचा दिनांक, बॅच क्रमांक, सदर उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक (एक्सापयरी डेट), निव्वळ वजन, विपणन कंपनीचे नाव, पत्ता तसेच कुक्‍कुट खाद्यात पशुजन्य घटक असल्यास ते देखील नमूद करावे लागणार आहेत.

...अशी होणार कारवाई

यासंबंधी १८ ऑक्‍टोबर रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यानंतर एक महिन्यात कंपन्यांना पॅकिंगवर घटक व इतर बाबी नोंदवाव्या लागतील. तसे न केल्यास ज्या तालुक्‍यांत उत्पादक कंपनी असेल त्या तालुक्‍याच्या सहायक आयुक्‍तांनी (पशुसंवर्धन) याबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍तांना कळवावे. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍तांना कंपन्यांना नोटीस बजावत कारवाई करून अहवाल पशुसंवर्धन आयुक्‍तांना द्यावा लागणार आहे. शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे कुक्‍कुट समन्वय समिती सदस्य शरद गोडांबे व शुभम महाले यांनी सांगितले.

पशुखाद्याच्या बॅगवर घटक नसल्याने आणि त्याची तपासणी होत नसल्याने बॅगमध्ये काहीही भरून त्याची विक्री केली जाते. आता अशा गैरप्रकारांना चाप बसणार आहे.
योगेश अस्वले, पोल्ट्री योद्धा फेडरेशन, जिल्हाध्यक्ष, सांगली
पोल्ट्री योद्धा फेडरेशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीच्या बैठकीत वारंवार हा मुद्दा मांडला. सातत्याने पाठपुरावा केल्याचे हे यश आहे.
तानाजी घाडगे, पोल्ट्री योद्धा फेडरेशन, जिल्हाध्यक्ष, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT