Agriculture Inflation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inflation : दरवाढीमुळे पीके घेणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर

Agriculture Production Cost : जादा पाऊस, प्रतिकूल हवामानामुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान, घटलेले उत्पादन, महाग झालेली खते, बियाणांमुळे भरमसाट वाढलेला उत्पादन खर्च, शेतीमालाचे पडत चाललेले दर यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

Team Agrowon

Dharashiv News : जादा पाऊस, प्रतिकूल हवामानामुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान, घटलेले उत्पादन, महाग झालेली खते, बियाणांमुळे भरमसाट वाढलेला उत्पादन खर्च, शेतीमालाचे पडत चाललेले दर यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यात आता रब्बी पेरणी काळात ट्रॅक्टरद्वारे शेती मशागत आणि पेरणी खर्चात सरासरी २० टक्के वाढ झाल्याने शेतकऱ्यांवरील संकट आणखीच गहिरे झाले आहे.

खरीप हंगामात सोयाबीन उत्पादनासाठी शेत नांगरणीपासून पीक पदरात पडेपर्यंत शेतकऱ्यांना उसनवारी करीत भरमसाट खर्च करावा लागला आहे. जवळ आहे ती जमा पुंजी संपली आहे. नैसर्गिक संकट, जादा पाऊस, रोगराई आदी संकटांचा सामना करीत कसेतरी थोडेशे पीक पदरात पडले.

उसनवारी, ठेवलेली उधारी देऊन दोन पैसे हातात पडतील, अशी अपेक्षा असतानाच सोयाबीनचे दर खाली-खाली पडत गेले. त्यामुळे दोन पैसे मिळायचे तर लांबच उसनवारी आणि उधारी तरी मिटेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा ठाकला आहे.

आता रब्बी हंगामातील पेरण्यांनी वेग पकडला आहे. जादा पाऊस झाल्याने शेतात तण माजले आहे. पेरणीसाठी रान तयार करायचे तर नुसत्या मोगडणीवर भागत नाही. रोटर केल्याशिवाय पर्याय नाही. त्याचे दर मोगडणीपेक्षा दुपटीने जास्त आहेत.

जादा पावसाने शेत चिबडलंय. तण माजलंय. पेरणीसाठी वाफसा नाही. पेरणीला उशीर होणार आहे. खरिपातील मालाला भाव नाही. आता रब्बीतून तरी काही हातात पडतं की नाही माहीत नाही.
- भरत सारडे, शेतकरी, अंबेजवळे, ता. धाराशिव.
डिझेलच्या दरांनी उसळी मारलेली आहे. त्यामुळे शेतीकामांचे दर वाढले आहेत. इतके दर घेऊनही ट्रॅक्टर मालकाच्या हातात फारकाही पडत नाही. या स्थितीला महागाई कारणीभूत असून ती कमी करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
- हर्षल धाबेकर, ट्रॅक्टर मालक, दूधगाव, ता. धाराशिव.
महागाईने कहर केला आहे. हातात काहीच राहिना. सोयाबीन, कांदा, दूध सर्वच मालाचे भाव तळाला चाललेत. बीए बीएड असूनही सुशिक्षित बेरोजगार आहे. नोकरी नाही म्हणून शेतीकडे वळलो. मात्र, शेतकरी म्हणून पूर्वीपेक्षा वाईट अवस्था झाली. आता शेतीही करूशी वाटेना. शेतात स्वतःसह कुटुंबाला फुकटच काम करावे लागत आहे. लोकांच्यात कामाला गेले तर ते परवडते.
- अमोल माळी, शेतकरी, भूम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC Inquiry: पुणे बाजार समिती गैरव्यवहाराच्या ‘चौकशी’ची पुन्हा चौकशी !

Agricultural College Irregularities: कृषी महाविद्यालयातील गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल पोलिसांकडे

Farm Machinery Bank: कृषी अवजारे बँकेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज

Fishing Season 2026: मासेमारीला ७६ दिवसांनी प्रारंभ

Tree Plantation Record: धाराशिवला बारा तासांत १० लाख रोपांची लागवड; जिल्हा प्रशासनाचा सलग दुसऱ्या वर्षी विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT