Red Banana
Red Banana Agrowon
ॲग्रो विशेष

Red Banana : आरोग्यदायी लाल केळी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का?

Team Agrowon

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि वर्षभर उपलब्ध होणाऱ्या केळी उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

युगांडा, फिलिपिन्स, ब्राझील, इंडोनेशिया, कोलंबिया या देशांतही केळीचे उत्पादन (Banana Production) घेतल जात. केळीच्या जागतिक उत्पादनापैकी भारतात २० टक्के उत्पादन होत.

भारतात आंब्यानंतर केळीची लागवड (Banana Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांत मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते.

यामध्ये प्रामुख्याने पिवळ्या केळीचा समावेश होतो. यातील काही भागात लाल केळीचीही (Red Banana) लागवड होते. 

लाल केळी नियमित खाणं फायदेशीर मानल जात. केळीच्या नियमित सेवनान ऊर्जा तर वाढतेच शिवाय शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.

हाडे मजबूत होतात. यासोबतच हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण मिळत.लाल केळीमध्ये पोटॅशियमही मुबलक प्रमाणात असतं.

जे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करत. यामध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. रोजच्या आहारात लाल केळीचा समावेश केला तर  वजन नियंत्रणात राहत आणि लठ्ठपणापासून बऱ्याच अंशी सुटका होते.

फॅटच प्रमाण खूपच कमी असत.रोज एक लाल केळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक फायबरचा पुरवठा होतो. मधुमेहाचा धोकाही कमी होतो. 

सामान्य केळीपेक्षा भाव जास्त मिळतो

सामान्य पिवळ्या केळीपेक्षा लाल केळीचे दर जास्त आहेत. प्रति किलो ५० ते १००  रुपयांपर्यंत लाल केळीची विक्री होते. प्रत्येक घडामध्ये ८० ते १०० केळी असतात.

घडाचे वजन सुमारे १३ ते १८ किलोपर्यंत भरत. महाराष्ट्रात लाल केळीची लागवड ठाणे, सोलापूर परिसरात आढळते.

सध्या उत्तर प्रदेशातील राज्यांमध्येही या केळीची लागवड होऊ लागली आहे. लागवड प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीनं होते. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते.

या सर्व गुणधर्मामुळ लाल केळी आरोग्यासाठी फायदेशार आहे याशिवाय लागवड केल्यास चांगला फायदा ही मिळवून देते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT