Almatti Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Almatti Dam : ‘आलमट्टी’सह पुराच्या कारणांचा अहवाल सरकारला देऊ

Kolhapur-Sangli Flood : ‘‘केंद्रीय जलशक्तीच्या अहवालानुसार २००५ पूर्वीचा पूर हा तिसऱ्या दिवशी उतरत होता; परंतु अलीकडे पूर तीन-तीन आठवडे ओसरत नाही.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापूर आलमट्टी धरणामुळेच येतो, अशी पूरबाधित शेतकऱ्यांसह विविध घटकांनी मांडलेली मते, त्यासह इतर कारणांचाही अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल. अहवाल सादर करताना त्याची प्रत आलमट्टी उंची वाढविरोधी संघर्ष समितीला दिली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी शनिवारी (ता. ३१) येथे दिली.

आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात काही दिवसांपूर्वी संघर्ष समितीने चिपरी येथे आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आंदोलकांसह पूरबाधित घटकांची मते जाणून घेऊन त्याचा अहवाल द्यावा, यासाठी हणमंत गुणाले यांना पाठविले होते. त्यांच्या उपस्थितीत ताराबाई पार्क येथील सिंचन भवन येथे बैठक झाली. आमदार अरुण लाड प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर इरिगेश फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर म्हणाले, ‘‘कृष्णा खोऱ्यातून ६०० टीएमसी पाणी आलमट्टीकडे जाते तर भीमा नदीचे पाणीही पुढे कर्नाटकात विसर्जित होते; मग जागतिक बँकेच्या कर्जातून तयार करण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे ८० ते ९० टीएमसीच पाणी दुष्काळी भागाला वळविले जात असेल तर पूर कसा कमी होणार, याचे उत्तर सरकारने द्यावे.’’

आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे म्हणाले, ‘‘केंद्रीय जलशक्तीच्या अहवालानुसार २००५ पूर्वीचा पूर हा तिसऱ्या दिवशी उतरत होता; परंतु अलीकडे पूर तीन-तीन आठवडे ओसरत नाही. याचे कारण शोधून सांगावे. पुराचे पाणी वहनाची क्षमताही घटली आहे. याचे कारण त्या वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी झाला. पुराचे पाणी थांबल्यामुळेच ते होत आहे. आलमट्टीच्या आडमुठेपणामुळेच २०२१ चा पूर आला.’’

माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, ‘‘कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजची उंची समुद्रसपाटीपासून ५११ मीटर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच पाण्याची फूग तयार होऊन पाणी मागे येते हे समोर आले आहे. त्यासाठी कोणता तज्ज्ञ आणण्याची गरज नाही.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

Well Repair Subsidy: अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना मिळणार विहीर दुरुस्तीचे अनुदान

Alphanso Mango Crisis: हापूस आंब्याचा हंगाम संकटात

Gas Theft Case: गॅस चोरीप्रकरणी १.२६ कोटींच्या मुद्देमालासह दोन मोठे टँकर जप्त

SCROLL FOR NEXT