Chhatrapati Sambhajinagar News: राज्यात सिंचन योजनांची प्रगणना १ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे नुकतेच पार पडले.
केंद्र शासनाकडून नव्याने सुरू होणाऱ्या लघू सिंचन योजनांची ७ वी प्रगणना व जलसाठा योजनांची दुसरी व मोठ्या; मध्यम प्रकल्पांच्या पहिल्या प्रगणनेसाठी हे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. राज्य प्रगणना आयुक्त तथा आयुक्त मृदा व जलसंधारण विभाग प्रकाश खपले यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात राज्यातील मृदा व जलसंधारण विभाग व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जलशक्ती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी श्रीमती प्रियंका कुलश्रेष्ठा व अजय बक्षी यांनी उपस्थितांना दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, दिलीप निपाणे, सहसंचालक श्रीमती मृणालिनी भूत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रगणनेमध्ये राज्यातील सर्व लघू सिंचन योजनांची जलसाठ्याची व मध्यम मोठ्या प्रकल्पाची तसेच झऱ्यांची मोबाइल ॲप व वेब पोर्टलद्वारे प्रगणना होणार आहे. प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी अप्पर आयुक्त तथा नोडल अधिकारी (प्रगणना) नितीन दुसाने मृदा व जलसंधारण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सांख्यिकी कक्षातील अधिकारी व कर्मचारी तसेच आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
...याविषयी झाले प्रशिक्षण
निर्मित सिंचन क्षमता व पाण्याचा वापर याबाबतची निश्चित माहिती गोळा करणे.
दीर्घकालीन व अल्पकालीन सिंचन योजनांच्या आखणीसाठी नियोजन करणे.
भूजल पाणीसाठ्याच्या उपलब्धतेबाबत अंदाज वर्तविणे.
जल योजनांबाबत भविष्यात धोरण निश्चित करणे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.