Paddy Production agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Production : धान खरेदीचे गुजरात कनेक्शन उघड झाल्यावर चौकशी

Gujarat Connection Paddy Purchase : आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीचे गुजरात कनेक्शन उघड झाल्यावर महामंडळाने सोमवारी (ता. ५) पांढुर्ली येथील रेणुका राईस मिलची चौकशी केली.

sandeep Shirguppe

Nashik Paddy : आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीचे गुजरात कनेक्शन उघड झाल्यावर महामंडळाने सोमवारी (ता. ५) पांढुर्ली येथील रेणुका राईस मिलची चौकशी केली. तसेच, या राईस मिलच्या संचालकांनी आदिवासी विकास विभाग व नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयास आपला खुलासाही सादर केला आहे.

आदिवासी विकास महामंडळाचे ट्रक गुजरातला धान देत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’ने उघडकीस आणला. या प्रकरणी या विभागाने चौकशी समिती नियुक्त केली. त्यांनी सुरगाणा येथून पाहणी करीत गुजरात कनेक्शनची कागदपत्रे व गाड्यांची माहिती जाणून घेतली. दरम्यान, सोमवारी चौकशी समितीने रेणुका राईस मिलला भेट देत तेथील गुदामाची पाहणी केली.

दरम्यान, राईस मिलच्या संचालकांनी सोमवारी खुलासाही सादर केला आहे. त्यानुसार २८ एप्रिलला सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथील तीन वाहने (एमएच १५ एफव्ही ५०३३, एमएच १७ बीवाय ३३१७ व एमटीएस ५७९) राईस मिलमध्ये खाली झाली आहेत.

एक हजार १५० कट्टे या ठिकाणी ठेवण्यात आले. त्याची पडताळणीही समितीने केली. या प्रकरणी आपला संबंध नसल्याचे रेणुका राईस मिलच्या संचालकांनी खुलाशात म्हटले आहे. त्यामुळे चौकशी समिती आता काय अहवाल देते, याकडे लक्ष लागून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

Livestock Breeding Policy: महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण : क्षेत्रीय आव्हाने आणि उपाययोजना

Soil Testing Technology: सेन्सर-आधारित मृदा आरोग्य परीक्षण

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

SCROLL FOR NEXT