Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

State Spokesperson Vikas Lawande: पुणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून सर्व संचालकांची ‘ईडी’ व इन्कम टॅक्स विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. अशी माहिती प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Team Agrowon

Pune News: पुणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून सर्व संचालकांची ‘ईडी’ व इन्कम टॅक्स विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे पत्रकार भवन येथे बुधवारी (ता. ९) श्री. लवांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संघटक विक्रांत पाटील हे उपस्थित होते. श्री. लवांडे म्हणाले की, संचालक आल्यापासून बाजार समितीत टेंडर, सेस घोटाळा, मोशी बाजारातील दिलेले गाळे, सुरक्षा रक्षक नियुक्तीमध्ये झालेला घोटाळा, डमी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक, बेकायदा पद्धतीने पार्किंग वाटप, टपऱ्या उभारणे, आडतदारांचे दप्तर तपासणी, ५५ जागेवरील अनधिकृत वसुली, फुलबाजार घोटाळा यासह विविध गैरकारभार आणि भ्रष्टाचार झाले आहे.

पालकमंत्री अजित पवार यांना सकाळी उठून प्रत्येक काम पाहण्याची व गुणवत्ता तपासण्याची सवय आहे. चांगली सवय आहे, परंतु त्यांनी पुणे बाजार समितीत पहाटे येऊन सर्व बाजाराची पाहणी करावी. त्यावेळी आम्हालाही बोलविण्यात यावे. त्यानंतर दोषींवर सक्त कारवाई करावी, अशी मागणी श्री. लवांडे यांनी केली. बाजार समितीतील गैरकारभार आणि घोटाळ्याबद्दल मी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली आहे. यावर त्यांनी एकत्रित बैठक घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याचे श्री. लवांडे यांनी सांगितले.

चौकशी समितीच्या अध्यक्षांवर आक्षेप

पुणे जिल्हा ग्रामीणचे उपनिबंधक प्रकाश जगताप यांचे संचालक मंडळाशी हितसंबध आहेत. त्यांनीच संचालक मंडळाला अभय दिले आहे. या आधी संचालकांनी काही वेळा त्यांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी कोणतीही चौकशी केली नसल्याचा आरोप करून श्री. लवांडे यांनी चौकशी समितीचे अध्यक्ष बदलण्याची मागणी केली.

माझ्याकडे जी चौकशी मुलाणी अहवालाबाबत होती. त्या चौकशीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त बाजार समितीची कोणतीही चौकशी माझ्याकडे देण्यात आलेली नाही. त्यामुळे संचालक मंडळाला अभय देण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. सर्व आरोप चुकीचे आहेत.
प्रकाश जगताप, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT