Maharashtra Budget 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा

Maharashtra Budget 2024 : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Team Agrowon

Interim budget : मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (ता.२९) विधानसभेत केला.

राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रिलियन डॉलर करणार आहे. एक ट्रिलियन डॉलर शब्द म्हणजे फुगवलेला आकडा आहे. अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढवायचे असेल तर महसूल आणणार कुठून, कारण राज्यात उद्योग राहिलेले नाहीत. तज्ज्ञांचा अहवाल झोप उडवणारा आहे. तरी तुम्ही एक ट्रिलियनची भाषा करत असून, तुमचा हा आकड्यांचा खेळ राज्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

विधानसभेत सन २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पावर गुरुवारी (ता. २९ फेब्रुवारी) चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांचे वाभाडे काढले. अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी पैशातून मते मिळविण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी ही सरकारची युक्ती आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, त्यामुळे त्यांना साड्यांऐवजी सरकारने शस्र वाटावीत, अशी उपहासात्मक टीका वडेट्टीवार यांनी केली. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिस पत्नींचा जाहीर अपमान करतात. वर ‘‘आमचा बाप सागर बंगल्यात बसला असून आमचे कुणी वाकडे करू शकणार नाही,’’ अशी भाषा वापरतात. ‘‘हा महिलांचा सन्मान आहे का,’’ असा सवाल  वडेट्टीवार यांनी केला.

अर्थसंकल्पात स्मारकाच्या घोषणा केल्या. एवढ्या सगळ्या स्मारकांना पैसा दिला. पण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे काय केले, याचा उल्लेख केला नाही. या दोन्ही स्मारकाकडे तुमचे अक्षम्य दुर्लक्ष आहेच. पण पुणे येथील महात्मा फुले स्मारकाला किती निधीची तरतूद केली हे तुम्ही सांगितले पाहिजे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारताना मर्जीतल्या कंपन्यांना कामे दिली जातात. प्रकल्पाच्या किमती फुगवल्या जातात. चौकशीचा ससेमिरा अधिकाऱ्यांच्या मागे लावून हवी तशी कामे करून घेतली जातात. या कामांमुळे सरकारी तिजोरीवर किती बोजा येणार याचा उल्लेख तुम्ही का करत नाही, असेही वडेट्टीवार यांनी सुनावले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT