Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : घन लागवडीमुळे कापसाची उत्पादकता वाढली

Cotton Productivity : विशेष कापूस प्रकल्पांतर्गत शेतकरी वैजनाथ गडदे, उद्धव गडदे आणि नवनाथ गोरे यांनी घन लागवडीमुळे कापसाची उत्पादकता वाढली, असे मत व्यक्त केले.

Team Agrowon

Beed News : विशेष कापूस प्रकल्पांतर्गत शेतकरी वैजनाथ गडदे, उद्धव गडदे आणि नवनाथ गोरे यांनी घन लागवडीमुळे कापसाची उत्पादकता वाढली, असे मत व्यक्त केले. दीनदयाल शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, डिघोळअंबा, अंबाजोगाई व केंद्रीय कापूस संशोधन संस्थान नागपूरच्या वतीने विशेष कापूस प्रकल्पांतर्गत धारूर तालुक्यातील मोरफळी येथे कापूस प्रक्षेत्र दिवस आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी कापसाच्या उत्पादन वाढीकरिता वातावरणातील सततच्या बदलांमुळे पिकांवर होणाऱ्या परिणामाचे अचूक नियोजन करण्यासाठी कापूस घन लागवड केली असता बोंडाची संख्या वाढते व वृद्धी संप्रेरकाचा वापर करून बोंडाचा आकार वाढवून उत्पादनात होणारी वाढ, कीटकांच्या अंडकोषाची दिसणारी लक्षणे व त्यासाठी करावयाची उपाययोजना, कोरडवाहू, उथळ तसेच मध्यम खोल जमिनीसाठी कपाशीतील सघन लागवड पद्धती कशाप्रकारे फायदेशीर आहे.

तसेच यांत्रिक पद्धतीने कापूस वेचणीसाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे याची माहिती दिली. यानंतर पीकविद्या विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकातील खत व्यवस्थापन, स्वच्छ कापूस वेचणी व साठवणपर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ. प्रदीप सांगळे यांनी कापूस पीक व रब्बी हंगामातील रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.

धारूर तालुका कृषी अधिकारी जनार्दन भगत यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब, रब्बी हंगामातील पिके, खत व्यवस्थापन व कृषी विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना याबद्दल शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

व्यासपीठावर गावचे सरपंच महादेव गडदे, शास्त्रज्ञ पीक संरक्षण विभाग कृविके, अंबाजोगाई डॉ. प्रदीप सांगळे, मंडळ कृषी अधिकारी धारूर यशवंत दहीफळे, गावचे कृषी सहाय्यक सुधीर रोकडे, ग्रामसेवक रामदास गडदे, तसेच प्रगतशील शेतकरी उद्धव गडदे, वैजनाथ गडदे, नवनाथ गोरे आणि गावातील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन सूरज पोकळे तसेच रवींद्र अंबाड यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रदीप चव्हाण आणि शिवाजी किर्जत यांनी विशेष प्रयत्न केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT