Crop Protection Agrowon
ॲग्रो विशेष

Pink Bollworm Management : कपाशीत एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान अवलंबावे

Cotton Crop Management : विद्यापीठाने आता सरळ वाणांमध्ये बीटी तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे नवीन वाण तीन वर्षांपर्यंत पुनर्लागवड करण्यायोग्य असून शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्चही कमी होईल.

Team Agrowon

Pabhani News : गुलाबी बोंडअळीच्या प्रतिकारशक्ती व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन योजना आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेची नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन : गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प’अंतर्गत मंगळवारी (ता. २५) आयोजित शेतकरी प्रशिक्षणा अध्यक्षस्थानी डॉ. इंद्र मणी होते.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक जाधव, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, गहू व मका योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील उमाटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिगंबर पटाईत, प्रगतिशील शेतकरी रत्नाकर ढगे, पंडित थोरात आदी उपस्थित होते.

डॉ. बेग म्हणाले, की विद्यापीठाने आता सरळ वाणांमध्ये बीटी तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे नवीन वाण तीन वर्षांपर्यंत पुनर्लागवड करण्यायोग्य असून शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्चही कमी होईल. मागील वर्षी काही शेतकऱ्यांनी १५ क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले असून सर्व शेतकऱ्यांनी या पुढील हंगामात अधिकाधिक उत्पादनाचा निर्धार करावा.

या वेळी खानापूर, आर्वी (ता. परभणी), टाकळगव्हाण, लोणी बुद्रुक, बाभळगाव (ता. पाथरी) या पाच गावांतील प्रत्येकी १२ अशा एकूण ६० शेतकऱ्यांना विविध निविष्ठा तसेच कृषी विद्यापीठाच्या ‘कृषी दैनंदिनी २०२५’ चे वाटप करण्यात आले.

प्रास्ताविक डॉ. जाधव यांनी केले. डॉ. पटाईत यांनी कपाशीवरील कीड व्यवस्थापन, डॉ. पी. बी. जाधव यांनी घनपद्धतीने कापूस लागवड तर डॉ. नेहरकर यांनी कीटकनाशकांच्या संतुलित वापराबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT