Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Kahrif Crop Management : सोयाबीन, कपाशीत एकात्मिक पीक व्यवस्थापन करावे

Soybean Crop Management : बुरशीनाशक, कीडनाशकाची बीज प्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी करावी. एकरी झाडांची संख्या योग्य राखावी. येलो मोझॅकचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे.

Team Agrowon

Hingoli News : सोयाबीन आणि कपाशी या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी पेरणीपूर्व मशागत, बीजप्रक्रिया यासह एकात्मिक पीक व्यवस्थापनावर शेतकऱ्यांनी भर देण्याची गरज आहे असे प्रतिपादन तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषिविद्यावेत्ता विशेषज्ञ राजेश भालेराव यांनी केले.

‘सकाळ ॲग्रोवन’ आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सोयाबीन व कापूस पीक व्यवस्थापन’ या विषयावर बुधवारी (ता. २५) साळवा (ता. कळमनुरी) येथील शिव पार्वती मंगल कार्यालयात आयोजित ॲग्रोवन संवाद चर्चासत्रात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी सरपंच नागोराव करंडे होते. एचडीएफसी बँकेचे कळमनुरी शाखा व्यवस्थापक आशिष दळवी, कृषी विभाग व्यवस्थापक जगदीश अक्कमवाड, कृषी कर्ज अधिकारी प्रसाद मोरे, तालुका कृषी अधिकारी के. एम. जाधव, उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, उगम ग्रामीण विकास संस्थेचे जयाजीराव पाईकराव, प्रगतिशील शेतकरी गोरखनाथ हाडोळे, विनायक माखणे, एचडीएफसी बँकेचे आकाश जाधव, गंगाधर वायचाळ उपस्थित होते.

भालेराव पुढे म्हणाले, की कृषिविषयक ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांने नियमित ‘अॅग्रोवन’चे वाचन केले पाहिजे. बुरशीनाशक, कीडनाशकाची बीज प्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी करावी. एकरी झाडांची संख्या योग्य राखावी. येलो मोझॅकचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे.कपाशीमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी झेंडू,चवळी आदी सापळा पिकांची लागवड करावी. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावावेत.

शिफारशीत खतांच्या मात्रा तसेच कीटकनाशकाचा वापर करावा. दळवी म्हणाले, की एचडीएफसी बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. आर्थिक नियोजन व पैशाची बचत केली तर शेतकरी समृध्द होतील. अक्कमवाड म्हणाले, की शेतीपूरक दुग्ध व्यवसाय तसेच प्रक्रिया उद्योगातून उत्पन्नाची जोखीम कमी होईल.

जाधव म्हणाले, की कृषी विभागाच्या योजनेच्या लाभासाठी अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी साठी नोंदणी करावी. ओळंबे म्हणाले, की बेणे प्रक्रिया करून हळद लागवड करावी. पाईकराव म्हणाले, की खर्च कमी करून सुपीकता वाढीसाठी शून्य मशागत तंत्राचा अंगीकार करावा. प्रास्ताविक ‘अॅग्रोवन’चे जिल्हा बातमीदार माणिक रासवे यांनी केले. सूत्रसंचालन मोरे यांनी केले. अॅग्रोवनचे वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT