Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

Ambia Bahar : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना ही सर्वसाधारणपणे ज्या महसूल मंडळात संबंधित फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे अशा महसूल मंडळांना फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येऊन तेथे ही योजना राबविण्यात येते.

विनयकुमार आवटे

Indian Agriculture : कमी पाऊस/जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आर्द्रता अशा विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने हवामान आधारित पीकविमा योजना लागू केली आहे. आंबिया बहर २०२४ या योजनेमध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब,आंबा, काजू, केळी, द्राक्ष,पपई,स्ट्रॉबेरी या फळपिकांचा समावेश आहे.

सर्वसाधारणपणे ज्या महसूल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे अशा महसूल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येऊन तेथे ही योजना राबविण्यात येते. केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण लागू राहणार आहे.

फळपीक उत्पादनक्षम वय (वर्ष)

आंबा, चिकू, काजू ५

लिंबू ४

संत्रा, मोसंबी, पेरू,सीताफळ ३

डाळिंब, द्राक्ष २

केळी, पपई, स्ट्रॉबेरी --

योजना राबविणारी कंपनी

जिल्हा विमा कंपनी

जळगाव , नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, रत्नागिरी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

जालना फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.

ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातुर, बुलडाणा, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशीम बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

योजनेची माहिती

योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात.

पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र , फळबागेचा जीओ टॅगींग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्यांच्याकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनी योजनेत सहभाग घ्यावा.

शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीवर फक्त विमा घ्यावा. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्यांच्या मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तव दर्शी विमा हप्ता ३५ टक्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हा निहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरावयच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.

फळपिकनिहाय प्रती हेक्टर नियमित विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता

फळपीक प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम (रु.) शेतकऱ्याने भरायचा विमा हप्ता (रु.प्रती हेक्टर)

संत्रा १,००,००० ५,००० ते १२,०००

मोसंबी १,००,००० ५,०००

आंबा १,७०,००० ८,५०० ते २१,२५०

काजू १,२०,००० ६,००० ते ७,८००

पपई ४०,००० २,०००

डाळिंब १,६०,००० ८,००० ते २०,०००

केळी १,७०,००० ८,५००

द्राक्ष (क) ३,८०,००० १९,०००

स्ट्रॉबेरी २,४०,००० १२,०००

टीप : गारपीट या हवामान धोक्यापासून आंबिया बहरामधील फळपिकांना विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी वरील नियमित विमा व्यतिरिक्त वेगळा विमा हप्ता बँकेत भरावा लागतो.

फळपिकनिहाय गारपिटीपासून दिले जाणारे प्रति हेक्टर विमा संरक्षण, शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता

फळपीक प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम (रु.) शेतकऱ्याने भरायचा विमा हप्ता (रु.प्रती हेक्टर)

संत्रा ३३,००० १,६५० ते २,८०५

मोसंबी ३३,००० १,६५०

आंबा ५७,००० २,८५० ते ४,८४५

काजू ४०,००० २,०००

पपई १३,००० ६५०

डाळिंब ५३,००० २,६५०

केळी ५७,००० २,८५०

द्राक्ष (क) १,२७,००० ६,३५०

स्ट्रॉबेरी ८०,००० ४,०००

योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक

फळपीक अंतिम दिनांक

स्ट्रॉबेरी १४ ऑक्टोबर

द्राक्ष १५ ऑक्टोबर

मोसंबी, केळी, पपई ३१ ऑक्टोबर

संत्रा, काजू, आंबा (कोकण) ३० नोव्हेंबर

आंबा (कोकण सोडून इतर विभाग) ३१ डिसेंबर

डाळिंब १४ जानेवारी

योजनेचे नियम

हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसुल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे) अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरापैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल (उदा. संत्रा, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब)

राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरिता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे.) आणि उर्वरित विभागाकरिता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके आणि दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हेक्टर मर्यादेपर्यंत राहील. सदर फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांनी ई - पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे. भाडे पट्टीने शेती करत असल्यास भाडे करार नोंदणीकृत असावा.

ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

आंबिया बहर फळपिकनिहाय विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी आणि विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक.

फळपिके समाविष्ट धोके विमा संरक्षण कालावधी

संत्रा अवेळी पाऊस १ डिसेंबर ते १५ जानेवारी

कमी तापमान १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी

जादा तापमान १ मार्च ते ३१ मे

गारपीट १ जानेवारी ते ३० एप्रिल

मोसंबी अवेळी पाऊस १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर

जास्त तापमान १ मार्च ते ३१ मार्च

जास्त पाऊस १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर

गारपीट १ जानेवारी ते ३० एप्रिल

डाळिंब अवेळी पाऊस १५ जानेवारी ते ३१ मे

जादा तापमान १ एप्रिल ते ३१ मे

जास्त पाऊस १ जून ते ३१ जुलै

गारपीट १५ जानेवारी ते

३० एप्रिल

काजू अवेळी पाऊस १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी

कमी तापमान १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी

गारपीट १ जानेवारी ते ३० एप्रिल

केळी कमी तापमान १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी

वेगाचा वारा १ मार्च ते ३१ जुलै

जादा तापमान १ एप्रिल ते ३१ मे

गारपीट १ जानेवारी ते ३० एप्रिल

द्राक्ष अवेळी पाऊस १६ ऑक्टोबर ते

३० एप्रिल

दैनंदिन कमी तापमान १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी

गारपीट १ जानेवारी ते ३१ मे

आंबा (कोकण) अवेळी पाऊस १ डिसेंबर ते १५ मे

कमी तापमान १ जानेवारी ते १० मार्च

जास्त तापमान १ मार्च ते १५ मे

वेगाचा वारा १६ एप्रिल ते १५ मे

गारपीट १ फेब्रुवारी ते ३१ मे

आंबा (इतर जिल्हे) अवेळी पाऊस १ जानेवारी ते ३१ मे

कमी तापमान १ जानेवारी ते

२८ फेब्रुवारी

जास्त तापमान १ मार्च ते ३१ मार्च

वेगाचा वारा १ एप्रिल ते ३१ मे

गारपीट १ फेब्रुवारी ते ३१ मे

स्ट्रॉबेरी अवेळी पाऊस व सापेक्ष आर्द्रता १५ ऑक्टोबर ते

३० नोव्हेंबर

अवेळी पाऊस, सापेक्ष आर्द्रता व जास्त तापमान १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल

कमी तापमान १ डिसेंबर ते ३१ मार्च

गारपीट १ जानेवारी ते ३० एप्रिल

पपई कमी तापमान १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी

वेगाचा वारा १ फेब्रुवारी ते ३० जून

जास्त पाऊस व आर्द्रता १५ जून ते ३० सप्टेंबर

गारपीट १ जानेवारी ते ३० एप्रिल

(लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT