Mango Cashew Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cashew Insurance : आंबा, काजू बागायतदारांना विमा परतावा जमा, वगळलेल्या ९ मंडलांनाही लाभ

Insurance Refund Farmers : मागील दोन महिने सुरू असलेल्या आंदोलनानंतर सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांच्या खात्यात पिक विमा परतावा जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

sandeep Shirguppe

Sindhudurg Farmers : मागील दोन महिने सुरू असलेल्या आंदोलनानंतर सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांच्या खात्यात पिक विमा परतावा जमा होण्यास सुरूवात झाली आहे. सोमवार (ता.२१) पासून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे आल्याचे माहिती समोर आली. पिक परताव्यातून वगळलेल्या ९ मंडलांना देखील परतावा मिळणार आहे. परताव्याच्या रक्कमेत सुमारे एक कोटीने वाढ झाली आहे. पिक परताव्याकरीता गेले दोन महिन्यापेक्षा जास्त काळ जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक होते.

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक विभागाचे तांत्रिक अधिकारी अरूण नातू म्हणाले की, जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना पिक विमा परतावा सोमवारपासून मिळण्यास सुरूवात झाली आहे. काजू पिकासाठी वगळलेल्या मंडळांना देखील परतावा मिळत आहे. हळूहळू सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल अशी माहिती नातू यांनी दिली.

हवामानावर आधारीत पिक विमा योजनेत सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू पिकांचा समावेश आहे. आंबा पिकाखालील १४ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र तर काजू पिकाखालील ५ हजार २४३ हेक्टर क्षेत्र असे एकूण १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. या योजनेत जिल्ह्यातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्या महिना दोन महिन्यापासून सातत्याने पिक परतावा मिळावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते.

पिक विमा कंपनीने सुरूवातीला ५७ पैकी ५६ मंडलातील आंबा पिकाला आणि ४६ मंडलातील काजु पिकाला ६७ कोटी ९४ लाख ३ हजार ४८० रूपये पिक विमा परतावा मंजुर केला होता. त्यानंतर काजुपिकाकरीता वगळलेल्या १० पैकी ९ मंडलामध्ये स्वंयचलित केंद्रे नसल्यामुळे या मंडलातील शेतकऱ्यांना नजीकच्या मंडलातील नोंदीप्रमाणे परतावा मिळावा याकरीता कृषी विभागाचे प्रयत्न सुरू होते. आता ९ मंडलांना परतावा मिळणार आहे. त्यामुळे पिक परताव्याची रक्कमेत १ कोटी रूपयांची वाढ झाली आहे.

काजू, आंबा उत्पादकांनाही परतावा

दरम्यान, सोमवारपासून सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक परताव्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. काही तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू पीक परतावा मिळाला आहे तर काहींना आंबा पीक परतावा मिळाला आहे. पुढील चार, पाच दिवसांत परतावा जमा होण्याची प्रकिया सुरू राहणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील २०२० च्या पीकविमा भरपाईचा निकाल लागेना

Onion Market : सोलापुरात कांदा खरेदीदार व्यापाऱ्याला आठ लाखांचा दंड

Sugarcane Bill : पावसाने खरीप वाया; ऊसबिलेही नाहीच

Grape Variety : द्राक्षाच्या नव्या वाणांच्या आयातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

Solapur Market Committee : सोलापूर बाजार समितीत १ हजार १६४ ट्रक कांद्याची आवक

SCROLL FOR NEXT