Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Advance crop Insurance : जळगावातील कापूस ‘अग्रिम’चे विमा कंपनीचे अपील फेटाळले

Crop Insurance : शासनाने मंजूर केलेला कापूस पिकाचा आगाऊ पीकविमा २५ टक्के रक्कमेचा आदेश ओरिएंटल विमा कंपनीने झुगारून आयुक्तांकडे अपील केले होते.

Team Agrowon

Jalgaon News : शासनाने मंजूर केलेला कापूस पिकाचा आगाऊ पीकविमा २५ टक्के रक्कमेचा आदेश ओरिएंटल विमा कंपनीने झुगारून आयुक्तांकडे अपील केले होते. सुनावणीदरम्यान विभागीय आयुक्त आणि कृषी सहआयुक्तांनी विमा कंपनीचे अपील फेटाळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यात सतत पावसाचा खंड पडल्याने कापूस, मका, बाजरी, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले होते. २१ दिवसांवर खंड पडल्यास विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीकविम्याच्या २५ टक्के रक्कम आगाऊ द्यावी, असा नियम असताना सरकारी विमा कंपनी ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनी २५ टक्के रक्कम देण्यास तयार नव्हती.

सर्वाधिक लागवड असलेल्या कापूस पिकाचा विमा ग्राह्य न धरता नाशिक विभागाचे कृषी सहआयुक्तांकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर रविवारी (ता. १९) नाशिक येथे सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणीला दोन शेतकरी प्रतिनिधी बोलावण्यात आले होते.

खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात ७६ कोटी रुपये कापूस पिकासाठी मंजूर झाल्याचे जाहीर झाले होते. मात्र परिस्थिती वेगळीच होती. विमा कंपनीने कमी खर्चाचे फक्त उडीद, मूग, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकांसाठी ४ कोटी ८८ लाख रुपये विमा ग्राह्य धरला होता. यावरून तक्रारी सुरू होत्या.

नाशिक येथील सुनावणीस आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी सहआयुक्त मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, शेतकरी प्रतिनिधी प्रा. सुभाष पाटील (शिरूड, ता. अमळनेर), दिनेश पाटील (धरणगाव), प्रशांत साळुंखे (मारवड) व ओरिएंटल विमा कंपनीचे प्रतिनिधी इंगळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT