Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Latur Crop Insurance: लातूर जिल्ह्यात विम्याचे १६४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Farmer Compensation: लातूर जिल्ह्यात २०२४ च्या खरिप हंगामातील पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना १६४ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

Anil Jadhao 

Pune News: लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी १६४ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई २३ एप्रिलपर्यंत जमा करण्यात आली. त्यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळणारी सर्व भरपाई शेतकऱ्यांना वाटण्यात आली.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीकविम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मंजूर झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये या चारही ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. काही जिल्ह्यांमध्ये तीन ट्रिगर तर काही जिल्ह्यांमध्ये दोन ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र लातूर जिल्ह्यात एकाच ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्यात आली.

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील भरपाईपोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली नाही. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून १६४ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. तसेच ही सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैगर्सिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली. काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल.

लातूर जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई काढण्याचे काम सुरु आहे. त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या दोन्ही ट्रीगरमधून मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर खात्यात जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT