Air Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Air Pollution : मोकळ्या श्‍वासासाठी ‘हवा’ सुधारा वसई-विरार महापालिकेला निर्देश

Air Pollution Suggestions for improvement : वसई-विरार शहरातील हवा प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच हवेचा दर्जा समाधानकारक पातळीवर आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसई-विरार महापालिकेला निर्देश दिले आहे.

Team Agrowon

Vasai News : वसई-विरार शहरातील हवा प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच हवेचा दर्जा समाधानकारक पातळीवर आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसई-विरार महापालिकेला निर्देश दिले आहे.

तसेच हवेच्या दर्जाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच नागरिकांना मोकळा श्‍वास घेण्यासाठी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ५० ते १०० दरम्यान असेल, याची खबरदारी घेण्यासाठी उपाययोजनांची यादी जाहीर केली आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. तसेच इमारतींचा पुनर्विकास, दुरुस्ती यासह रस्त्यावरून माती व अन्य बांधकाम साहित्यांची ये-जा सुरू असते. बेवारस वाहनांची गर्दीदेखील आहे, तर पदपथांवर फेरीवाले अतिक्रमण असल्याने कोंडी निर्माण होते.

या सर्व बाबी लक्षात घेता प्रदूषण व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वसईत हवेचा ढासळता गुणवत्ता निर्देशांक आरोग्य चिंता निर्माण करू शकतो, तसेच श्वसनासंबंधी तक्रारी येऊ शकतात. विरार शहरात ११० एक्यूआय म्हणजे फुप्फुस, हृदयरोग आजार व प्रौढ व्यक्तींना धोका

निर्माण होऊ शकतो. महापालिकेचा पर्यावरण अहवाल पूर्ण झाल्यापासून आजतागायत ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे हवेतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यास पालिका प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत नाही. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपाययोजना करण्याचे सुचवले होते; परंतु त्यावर अंमलबजावणी किती झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वसई-विरार महापालिकेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा प्रदूषण रोखण्यासाठी सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात येणार आहे, असे पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ. सागर घोलप यांनी सांगितले.

प्लॅस्टिकचा सर्रासपणे वापर

एकीकडे सखोल स्वच्छता मोहीम महापालिकेकडून राबविण्यात येत आहे; मात्र हवेतील गुणवत्ता निर्देशांक कमी झाला नाही, तर प्लास्टिकसारख्या घातक पिशव्यांच्या वापराच्या नियंत्रणावर अद्याप यश आले नाही.

नियंत्रण मंडळाच्या सूचना

पदपथ मोकळे करा.

धुळीचे मोजमाप करा.

सीसीटीव्हीने सार्वजनिक आणि खासगी पार्किंगचे निरीक्षण करा.

सार्वजनिक वाहने वगळता रस्त्याच्या बाजूचे पार्किंग हटवा.

खड्डेमुक्त रस्त्यासाठी

तरतूद करावी.

वाहनांच्या पार्किंगसाठी

नियुक्त क्षेत्रे निश्चित करा.

रस्ते धुतल्यानंतर यांत्रिकीकृत सफाई कामगारांची संख्या वाढवा.

मानवी स्वच्छतेऐवजी यांत्रिक व्हॅक्यूम क्लिनिंग वापरा.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत मंजूर कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाची कडक अंमलबजावणी.

सखोल साफसफाईद्वारे धुळीच्या पुनरुत्थानवर नियंत्रण.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT