Crop Inspection Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : अधिकारी, शास्त्रज्ञांकडून विविध पिकांची पाहणी

Organic Certification : या वनस्पतीला पूर्णतः सेंद्रिय प्रमाणपत्र कसे मिळेल, या पिकाची लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कशी करता येईल याबाबत चर्चा झाली.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यात विविध पिकांची लागवड व उत्पादन घेतले जात आहे. कृषी विभागाच्या मासिक चर्चासत्रादरम्यान नुकतीच जिल्हाभरातील अधिकारी व कृषी शास्त्रज्ञांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्राला ‘आत्मा’ प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी उपसंचालक अनुराधा गावडे, श्री. बुटे, केव्हीकेचे डॉ. विकास जाधव, शशांक दाते, श्री. गाभणे, संजय उमाळे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे (खामगाव), तुषार वाघ (मेहकर), विस्तार तंत्र अधिकारी अजय वाडे, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व तालुक्यातील कृषी सहायक व शेतकरी उपस्थित होते.

या चर्चासत्राचे प्रास्तविक मौजे सोगोडा येथे संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांनी केले. या गावातील प्रगतिशील शेतकरी राजेश हागे यांच्या औषधी वनस्पती पानपिंपरीच्या शेताला भेट दिली. या वनस्पतीला पूर्णतः सेंद्रिय प्रमाणपत्र कसे मिळेल, या पिकाची लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कशी करता येईल याबाबत चर्चा झाली.

दुर्मिळ होत चाललेल्या पानमळ्याला सुद्धा रमेश हागे यांच्या शेतात भेट दिली. त्यानंतर सोनाळा येथील अभिता संत्रा प्रोसेसिंग युनिटला भेट दिली. तेथे संत्रा ग्रेडिंग, पॅकिंग, वॅक्सिंग आदीबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर मौजे बावनबीर येथे शेतकरी गोपाल हागे यांच्या एकात्मिक पीकपद्धती शेतीला भेट दिली.

येथे संत्रा, सीताफळ, मिरची, शेततळे, गांडूळ युनिट, गोधन आदींची माहिती घेतली. त्यानंतर रिंगणवाडी येथे ‘पोकरा’अंतर्गत दिलेल्या शेडनेट हाऊसमधील भाजीपाला रोप निर्मितीची माहिती घेतली. शेवटी बोडखा येथे मोहन आगरकर यांच्या शेडनेट हाऊसमधील ‘ग्रँड ९’ केळी पिकाची माहिती घेतली.

अध्यक्षीय भाषणात श्री. उन्हाळे यांनी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले. श्री. उमाळे यांनी तूर पिकातील फायटोप्थोरा, पिसारी पतंग, शेंगमाशी, कापसावरील गुलाबी बोंडअळी तसेच हरभऱ्यातील मर रोगाविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती गावडे, श्री. व्यवहारे यांनीही मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT