sakal
ॲग्रो विशेष

Armyworm Infestation : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Public Awareness Guidance : पाऊस कमी असल्याने या अळीचा प्रादुर्भाव असून त्यावर काय आणि कशी उपाययोजना करावी, याबाबत शेतकऱ्यांत जनजागृती करत मार्गदर्शन केले.

Team Agrowon

Nashik News : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आठ तालुक्यांत दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर खुंटेवाडी (ता. देवळा) येथील शिवारातील मका पिकाची पाहणी केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिक यांच्या पथकाने केली. पाऊस कमी असल्याने या अळीचा प्रादुर्भाव असून त्यावर काय आणि कशी उपाययोजना करावी, याबाबत शेतकऱ्यांत जनजागृती करत मार्गदर्शन केले.

कसमादे भागातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक क्षेत्रावर मका पीक घेतले आहे. मात्र मका पिकावर लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी देवळा तालुक्यातील मका क्षेत्राला भेट देत पाहणी केली.

यात केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्राचे उपसंचालक डॉ. अतुल ठाकरे, सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी अमित जाधव, वनस्पती संरक्षण अधिकारी विशाल काशीद, वैज्ञानिक सहाय्यक महेश सावंत यांच्यासह येथील कृषी पर्यवेक्षक विजय व्हलगडे, कृषी विज्ञान केंद्र वडेल (ता. मालेगाव) येथील पीक संरक्षण शास्त्रज्ञ विशाल चौधरी,

कृषीविद्या विषय विशषज्ञ अधिकारी रूपेश खेडकर, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी यांनीही भऊर, वाजगाव, खुंटेवाडी, मटाणे, खर्डे, देवळा येथील मका पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांना अळीचा जीवनक्रम, वाढ, स्थान, कीड नियंत्रण व्यवस्थापनाची पद्धत, सार्वत्रिक स्तरावर फवारणी याबाबत माहिती देत मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT