Tur Production Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Production : बेडवरील तुरीने दिले भरघोस उत्पादन

Tur Farming : खारोडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी यावर्षी जून महिन्यात सोयाबीन अधिक तूर अशी आंतरपीक लागवड केली होती. तुरीच्या लागवडीसाठी बेड तयार केले. दोन बेडमध्ये साडेसात फुटांचे अंतर ठेवले.

Team Agrowon

Akola News : तालुक्यातील तळेगाव बाजार येथील माजी मुख्याध्यापक असलेले बाबूराव अजाबराव खारोडे यांनी यंदा एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. बेडवर लागवड असल्याने व योग्य व्यवस्थापन केल्याने हे उत्पादन मिळाल्याचे खारोडे यांचे म्हणणे आहे.

खारोडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी यावर्षी जून महिन्यात सोयाबीन अधिक तूर अशी आंतरपीक लागवड केली होती. तुरीच्या लागवडीसाठी बेड तयार केले. दोन बेडमध्ये साडेसात फुटांचे अंतर ठेवले. या बेडवर त्यांनी झिकझॅक पद्धतीने दोन तास तुरीचे लावले. दोन दिवसांपूर्वी या तुरीची मळणी केली असून ६० पोते उत्पादन झाल्याचे त्यांनी सांगितले.

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील माजी मुख्याध्यापक बाबूराव खारोडे हे सेवावृत्तीनंतर शेती करीत आहेत. या शेतात वेगवेगळे प्रयोग करून अधिक उत्पादन काढण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

मागील वर्षी याच शेतात सोयाबीन व तुरीची लागवड केली होती. अति पावसाने तेव्हा तुरीचे चार एकरांपैकी अर्ध्या एकरातील पीक केवळ वाचले होते. या भागात दर वर्षी अधिक पाऊस होत असल्याने यंदा त्यांनी बेडवर तुरीची लागवड केली. बेडवरील लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला.

सोयाबीनसोबतच तुरीच्या पिकाचे सुरुवातीपासून व्यवस्थापन केले. बेडवर टोकन पद्धतीने लागवड करून घेतली होती. लागवडीसोबत एकरी एक बॅग डीएपी खताची मात्रा दिली होती. त्यानंतर फवारणीतूनच खते, सुक्ष्म अन्नद्रव्ये दिली. तुरीच्या पिकावर चार वेळा किडनाशकाच्या फवारण्या घेतल्या. तर दोन वेळा तणनाशक मारले. यंदा तुरीवर ड्रोनच्या साह्याने फवारणी केली होती. आता पिकाची कापणी व मळणी केली असून विक्रमी अशी ६० पोते तूर या चार एकरातील पिकातून झाली आहेत. तर यापूर्वी सोयाबीनचे १६ क्विंटल ४० किलो उत्पादन आले होते.
- बाबूराव खारोडे, रा. तळेगाव बाजार, ता. तेल्हारा, जि. अकोला मो. ७४१४९३६७३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT