sandeep Shirguppe
तुरीची डाळ आहारात असली तर अनेक आरोग्य समस्या आणि पोषणाची कमतरता दूर होते.
तुरीच्या डाळीमध्ये फोलिक ॲसिड, लोह, प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे घटक असतात.
तुरीच्या डाळीत पचनासाठी महत्वाचे असे झिंक, कॉपर, सिलेनियम, मॅग्नीज हे देखील पोषक घटक असतात.
तुरीच्या डाळीत प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्यानं वजन कमी करण्यासाठी तुरीच्या डाळीची मदत होते.
तुरीच्या डाळीत असलेल्या प्रथिनांमुळे शरीरात पेशींची निर्मिती होण्यास मदत होते.
तुरीच्या डाळीत पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असल्यानं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुरीची डाळ महत्वाची असते.
अन्नाचं पचन नीट होण्यासाठी फायबरला महत्व आहे. तुरीच्या डाळीत फायबरचं प्रमाण जास्त असतं.
तुरीच्या डाळीतील पोटॅशियम रक्तातील साखर नियंत्रित करणारं वॅसोडिलेटरसारखं काम करतं.