ॲग्रो विशेष

Farmer Death : आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींचा विवाह सोहळा

Farmer Daughter Marriage : आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर मुलींच्या विवाहासाठी सोलापुरातील एसपी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. या मुलींच्या विवाहासाठी येत्या २५ डिसेंबरला सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘‘आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर मुलींच्या विवाहासाठी सोलापुरातील एसपी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. या मुलींच्या विवाहासाठी येत्या २५ डिसेंबरला सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती एसपी प्रतिष्ठानचे संस्थापक समीर पांडगळे यांनी दिली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्री. पांडगळे म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात अनेक गावांत शेतकरी, शेतमजूर आर्थिकदृष्ट्या परिस्थिती नसतानाही मुलींचा विवाह करण्यासाठी कर्ज काढून विवाह करतात. पुढे जाऊन कर्ज फेडण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात.

एकीकडे कुटुंबांचा खर्च आणि कर्जाची परिस्थिती, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आत्महत्येला बळी पडतात, अशा या कुटुंबांना सावरण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. पण अशा शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी विवाहसोहळ्याचे आयोजनही केले आहे.’’

वधू-वरांना मणिमंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य

‘‘आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे सहावे वर्ष आहे. भवानी पेठेतील मड्डी वस्तीत सारनाथ बुद्ध विहारच्या मैदानात २५ डिसेंबरला हा सोहळा होईल. सर्व जाती-धर्मांसाठी आणि दिव्यांगांसाठीही यात प्रवेश असेल.

या सोहळ्यात वधू-वरांना संपूर्ण पोशाख, मणिमंगळसूत्र, जोडवे, यासह संसारोपयोगी साहित्य आणि वऱ्हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात येईल. या विवाहाच्या नोंदणीसाठी ९६६५५७१७११ या मोबाइलवर संपर्क साधावा,’’ असे आवाहन पांडगळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT