Banana Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : भर उन्हाळ्यात केळी लागवडीसाठी पुढाकार

Banana Plantation : नेहमी वेगवेगळ्या पीक लागवडीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शेतकरी सचिन कोरडे यांनी भर उन्हाळ्यातही केळीची लागवड केली आहे.

Team Agrowon

Akola News : नेहमी वेगवेगळ्या पीक लागवडीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शेतकरी सचिन कोरडे यांनी भर उन्हाळ्यातही केळीची लागवड केली आहे. केळीची उन्हाळी हंगामात केलेली लागवड फायदेशीर ठरते असे त्यांनी सांगितले.

तेल्हारा तालुक्यातील हिंगणी शिवारात सचिन कोरडे यांची शेती असून केळीचे ते प्रामुख्याने उत्पादन घेतात. केळीला बाराही महिने मागणी राहत असून शेतकरी यातून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळवत आहेत. या वर्षी कोरडे यांनी केळी लागवडीसाठी टिश्युकल्चर रोपांची निवड केली आहे.

बारमाही पाण्याची सुविधा असल्याने या हंगामातही केळी लागवडीला पसंती दिली. या लागवडीमुळे पिकाची योग्य मशागत आणि लागवडीसाठी पुरेसा वेळ मिळतो. या काळात थोड्याफार प्रमाणात दमट हवामान असल्याने रोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. जमिनीत लवकर वाफसा येतो. उन्हाळी लागवड क्षेत्रातून पुढच्या वर्षी काढणी सुरू होते. या काळात बाजारात भाव देखील चांगला मिळतो, असे कोरडे यांनी सांगितले.

सचिन कोरडे यांनी उन्हाळ्यातही केळी लागवडीच्या धाडसाची माहिती मिळताच तेल्हारा तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, विनय राठी यांनी भेटी देऊन पिकाची पाहणी केली.

तेल्हारा तालुक्यात केळी पीक महत्त्वाचे असून शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळून देण्याची क्षमता असलेले पीक आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी केळीची लागवड केल्यास कृषी विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येईल, असे यावेळी गौरव राऊत म्हणाले.

उन्हाळ्यात केळीची लागवड ६ बाय ५ या अंतरावर तर बोरू लागवड केळीच्या रोपापासून एक फूट अंतरावर केली. केळीच्या रोपाला उन्हापासून संरक्षणासाठी बोरू लागवड महत्त्वाची ठरते. एप्रिल महिन्यात लागवडीमुळे पुढील हंगामात केळीला चांगला भाव मिळण्यास फायदा होतो, असा अनुभव आहे.
- सचिन कोरडे पाटील, शेतकरी, हिंगणी, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT