Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar: राज्याच्या महाभियोक्त्यांकडून 'एफआरपी'बाबत माहिती घेणार

FRP Payment Issue: न्यायालयाने ऊस शेतकऱ्यांच्या एकरकमी एफआरपी संदर्भात दिलेल्या निर्णयाची माहिती राज्य सरकार महाभियोक्त्यांकडून घेणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, या निर्णयाचा सखोल अभ्यास करून सरकार पुढील भूमिका ठरवेल.

मनोज कापडे

Pune News: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याबाबत न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयाबाबत राज्याच्या महाभियोक्त्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

व्हीएसआयमध्ये शनिवारी (ता.२२) पत्रकारांनी न्यायालयाच्या निकालाबाबत छेडले असता श्री.पवार म्हणाले,“शेतकऱ्यांना उसाचा रास्त व किफायतशीर दर देण्याविषयी कोणाचेही दुमत नाही.

न्यायालयाच्या निकालाबाबत बातम्या आलेल्या आहेत. परंतु, न्यायालयाने नेमका काय आदेश दिला आहे याची माहिती आम्हाला महाभियोक्ता देतील. त्यानंतर साखर उद्योगाचे काय म्हणणे आहे हे सरकार जाणून घेईल.”

उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील काही साखर कारखान्यांचे म्हणणे असेही आहे की त्यांनी तयार केलेली साखर वर्षभर विकावी लागते. पूर्ण विक्री झाल्याशिवाय त्यांना एफआरपी देण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत.

अर्थात, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे आमचे कर्तव्यच आहे. त्यासंदर्भात महाभियोक्त्याशी चर्चा करून सरकार पुढील निर्णय घेईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT