Ujani Dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam Water Level : उजनीकडे येणारा विसर्ग थंडावला, पाणीपातळी ६० टक्क्यांवर

Ujani Dam Water Level Update : पुण्याकडून गेल्या आठ-दहा दिवसांपासून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी केल्याने उजनी धरणाची पाणीपातळी सोमवारी (ता.९) ६० टक्क्यांपर्यंत स्थिरावली आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : पुण्याकडून गेल्या आठ-दहा दिवसांपासून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी केल्याने उजनी धरणाची पाणीपातळी सोमवारी (ता.९) ६० टक्क्यांपर्यंत स्थिरावली आहे.

पुणे जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे धरणातील अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत होते.

तब्बल ४० हजार क्युसेकपर्यंत पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत होते. मात्र, पाऊस थांबल्यानंतर विसर्गातही टप्प्याटप्प्याने घट झाली. सोमवारी (ता.९) पाण्याचा विसर्ग २१८८ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला.

विसर्ग कमी झाला असला तरी त्यात सातत्य असल्याने उजनी धरणातील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. सोमवारी धरणातील एकूण पाणीपातळी ४९४.८६० मीटरपर्यंत होती.

एकूण पाणीसाठा ९५.७५ टीएमसी, तर उपयुक्त साठा ३२.१० टीएमसीपर्यंत पोहोचला. पाण्याची टक्केवारी ५९.९१ टक्क्यांवर स्थिरावली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Shetkari 8th Installment : नमोचा आठवा हप्ता पुढच्या आठवड्या जमा होणार; दोन हजार रूपये बँक खात्यावर येणार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर; राज्यातील ८३ टक्के विवाहित, १.८ टक्के अविवाहित, तर ४.७ टक्के विधवा महिलांना मिळतोय लाभ

Bamboo Plantation: बांबू विकास प्रकल्पांतर्गत सहा लाख रोपांची लातूर जिल्ह्यात लागवड

Villagers Protest: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

MAGNET Project: ‘मॅग्नेट’च्या अभ्यासदौऱ्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT