Soybean Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Disease : कापूस, सोयाबीन, तूर पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव

Soybean Disease : यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील २८ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन यलो मोझॅक व पांढरी माशीच्या आक्रमणाने हातून जाणार आहे.

Team Agrowon

Amaravati News : यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील २८ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन यलो मोझॅक व पांढरी माशीच्या आक्रमणाने हातून जाणार आहे. सततच्या पावसाने उर्वरित क्षेत्रातील फुलोऱ्यावरील सोयाबीनलाही धोका निर्माण झाला असून नुकसानीमुळे उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता कृषी विभागाने पाहणीअंती वर्तविली आहे. कापूस व तुरीवर कीडरोगांचे आक्रमण झाले आहे.

जिल्ह्यात १ जून ते १९ सप्टेंबर या कालावधीत ७३६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अपेक्षीत ८०५.७० मिलिमीटरच्या तुलनेत तो ९१ टक्के असून पावसाची तूट असली तरी तो सतत झाल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस व तूर ही मुख्य पिके जिल्ह्यात घेतली जातात.

यंदा जिल्ह्यात २ लाख ६४ हजार ८४० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी आहे. पिक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. सतत पावसामुळे १९ हजार ७३ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनवर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे.

तिवसा तालुक्यातील २६१० हेक्टरमधील सोयाबीनवर पांढरी माशीचा तर, ५३८८ हेक्टरमधील सोयाबीनला शेंगा नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९४६ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनवर मूळकुज या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे व दर्यापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे फुलधारणा व फळधारणा झालेली नाही.

सतत झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असून उत्पन्नात घट येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार, दर्यापूर व धारणी तालुक्यांतील फुलोऱ्यावर आलेल्या कापसाची वाढ सततच्या पावसाने खुंटली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT